Singer Armaan Malik got married to Aashna Shroff: नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रसिद्ध बॉलीवूड गायक अरमान मलिक विवाहबंधनात अडकला आहे. अरमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. अरमानने त्याची गर्लफ्रेंड आशना श्रॉफशी लग्न केलं आहे. मागील बऱ्याच वर्षांपासून अरमान व आशना रिलेशनशिपमध्ये होते. अखेर दोघांनी लग्नगाठ बांधली असून आयुष्यातील नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे.

‘मैं रहूँ या ना रहूँ’, ‘जेहर’, ‘बोल दो ना जरा’, ‘पहेला प्यार’, ‘मुझको बरसात बना लो’ अशा अनेक लोकप्रिय गाण्यांचा गायक अरमान मलिकने आयुष्यातील नवीन इनिंग सुरू केली आहे. अरमानने त्याची गर्लफ्रेंड आता पती-पत्नी झाले आहेत. अरमानने इन्स्टाग्रामवर लग्नातील फोटो पोस्ट केले आहेत. ‘तू है मेरा घर’ असं कॅप्शन अरमानने या फोटोंना दिलं आहे.

Actress Rutuja Limaye Wedding
४ वर्षांच्या रिलेशननंतर ‘ही’ अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकांमध्ये केलंय काम, पती देखील आहे अभिनेता
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
aishwarya rai says chala chala in marathi video viral
Video: पती अभिषेक बच्चन अन् लेकीबरोबर मुंबईत परतली ऐश्वर्या राय; मराठीत म्हणाली असं काही की…, पाहा व्हिडीओ
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
navri mile hitlerla serial new guest coming to the Aj family
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत जहागीरदारांच्या घरी येणार नवी पाहुणी; कोण आहे ती? पोस्टर पाहून नेटकऱ्यांच्या कमेंट्स
kanguva actor surya and jyothika in shaitan
३५० कोटींचे बजेट अन् कमावले फक्त…; बायकोचा सिनेमा ब्लॉकबस्टर, तर नवऱ्याचा चित्रपट ठरला सुपरफ्लॉप
Nupur Shikhare Ira Khan Trending Marathi Reel Viral
Video: ‘आले तुफान किती…’ म्हणत नुपूर शिखरेचं पत्नी आयरा खानबरोबर रील; क्रांती रेडकरसह चाहत्यांना हसू आवरेना
Marathi actress Tejaswini Sunil married to Shreeram Nijampurkar
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने ३१ डिसेंबरला बांधली लग्नगाठ, पारंपरिक पद्धतीने पार पडला सोहळा, पाहा Photos

हेही वाचा – प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने ३१ डिसेंबरला बांधली लग्नगाठ, पारंपरिक पद्धतीने पार पडला सोहळा, पाहा Photos

अरमान मलिकने पत्नी आशनाला टॅग करत लग्नाचे ६ फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ते दोघेही लग्नाचे विधी पूर्ण करताना दिसत आहेत. अरमान व आशना यांच्या लग्नातील लूकची खूप चर्चा होत आहे. आशना केशरी रंगाच्या लेहेंग्यात खूप सुंदर दिसत आहे, तर अरमानने फिकट गुलाबी रंगाची शेरवानी घातली आहे, दोघेही एकत्र खूप क्यूट दिसत आहेत.

हेही वाचा – ‘तारक मेहता..’ फेम ‘सोनू भिडे’ अडकली लग्नबंधनात, बाबाची भूमिका करणारा मंदार चांदवडकर माफी मागत म्हणाला…

पाहा पोस्ट –

अरमानची पत्नी आशनाबद्दल बोलायचे झाल्यास ती ग्लॅमरविश्वात सक्रिय आहे. आशना एक लोकप्रिय यूट्यूबर आहे, ती फॅशन आणि ब्यूटी व्लॉग बनवते. तिचा सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. अरमान मलिकपेक्षा आशना वयाने मोठी आहे. अरमान २९ वर्षांचा असून आशना ३१ वर्षांची आहे. (Armaan Malik Aashna Shroff Age Gap)

हेही वाचा – “तिचा फोन नंबर…”, मनीषा कोईरालाबद्दल विचारल्यावर काय म्हणालेले नाना पाटेकर? एकेकाळी दोघांच्या अफेअरच्या होत्या चर्चा

अरमान मलिकने ऑगस्ट २०२३ मध्ये त्याची गर्लफ्रेंड आशनाशी एंगेजमेंट केली होती, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर दोघेही २०२४ मध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चा होत होत्या. पण २०२५ सुरू होताच त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. अरमान व आशनाने त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही.

Story img Loader