‘प्रिन्स ऑफ रोमान्स’ नावाने ज्याला ओळखलं जातं तो बॉलीवूडचा गायक, गीतकार, व्हॉइस ओव्हर परफॉर्मर आणि अभिनेता अरमान मलिक हा सध्याच्या तरुणाईचा लाडका आवाज आहे. अरिजित सिंगपाठोपाठ अरमानचेही भरपूर चाहते आहेत. सुप्रसिद्ध संगीतकार सरदार मलिक यांचा नातू आणि अनु मलिक यांचा तो भाचा आहे हे खूप कमी लोकांना ठाऊक आहे. नुकतंच अरमानने बॉलीवूडमधील राजकारण आणि गडद बाजू याबद्दल भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गायकांना मानधन मिळत नाही, अशी तक्रार त्याने नुकतीच केली आहे. यूट्यूबर राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये अरमानने हजेरी लावली, या मुलाखतीदरम्यान त्याने या गोष्टींचा खुलासा केला. बॉलीवूड चित्रपटात गाणाऱ्या गायकांना पैसे मिळत नाहीत, शिवाय त्यांना आयत्या वेळी बदलण्यात येतं, असे बरेच आरोप आरमानने केले आहेत.

आणखी वाचा : Blog: ‘The Kerala Story’ चित्रपटाचा असाही परिणाम; मुंबई ते डोंबिवली लोकल प्रवासादरम्यान आलेला सुन्न करणारा अनुभव

याविषयी बोलताना तो म्हणाला, “तो एक काळ होता, जेव्हा माझ्याऐवजी इतर गायकांना ऐनवेळी ते गाणं गाण्यासाठी घेतलं जायचं. त्या वेळी मला भीती वाटायची, मी एक चांगला गायक नाहीये का? हा प्रश्न सतत मला छळत असे. मी जर एखादं गाणं गाण्यात कुठे कमी पडलो असेन आणि त्यातून मला काढण्यात आलं तर ती गोष्ट मी समजू शकतो, पण केवळ राजकारणामुळे मला ते गाणं न मिळणं हे मी मान्य करू शकत नाही. हे माझ्या बाबतीत बऱ्याचदा घडलं आहे.”

पुढे गायकांना मिळणाऱ्या मानधनाबद्दल तो म्हणाला, “गायकांना चित्रपटातील गाणी गाण्यासाठी पैसे मिळत नाहीत. आता गायकांनाही याची सवय झाली आहे. याबद्दल कुणीही बोलायला तयार नाही. निर्मात्यांना वाटतं की, जर चित्रपटातील एखादं गाणं हीट झालं तर गायकांना लाईव्ह शोजमधून चिकार पैसे मिळतात. बऱ्याचदा संगीत दिग्दर्शकालाही पैसे मिळत नाहीत. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून होणारी कमाई ही म्युझिक लेबल्सच्या खिशात जाते. फार कमी लोकांना ही गोष्ट ठाऊक आहे.”

अरमान मलिक याला वयाच्या चौथ्या वर्षापासूनच त्याच्या कुटुंबाकडूनच भारतीय शास्त्रीय संगीताचं ट्रेनिंग मिळालं. ज्या वेळी त्याने ‘सा रे गा मा पा लिटिल चॅम्प्स’साठी पहिलं ऑडिशन दिलं, त्या वेळी अरमान केवळ नऊ वर्षांचा होता. अरमान मलिक याने त्याच्या छोट्याशा करिअरमध्ये बरीच हीट गाणी दिली आहेत. आतापर्यंत जवळजवळ त्याने १००-२०० कमर्शिअल जाहिरातींमध्ये आपला आवाज दिलाय. याबरोबरच लंडनमधल्या Wembley थिएटरमध्ये लाइव्ह परफॉर्म करणारा अरमान हा सगळ्यात कमी वयाचा बॉलीवूडमधला गायक ठरला.