Diljit Dosanjh Live Concert: प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझचे लाइव्ह कॉन्सर्ट सध्या जोरदार सुरू आहेत. ‘दिल-ल्यूमिनाटी टूर २०२४’च्या माध्यमातून दिलजीतचे भारतासह जगभरात ठिकठिकाणी कॉन्सर्ट होतं आहेत. दिलजीतच्या कॉन्सर्टला तुफान प्रतिसाद मिळत आहे. सेलिब्रिटी देखील खास हजेरी लावत आहेत. नुकताच चंदीगडमध्ये दिलजीत दोसांझचा लाइव्ह कॉन्सर्ट पार पडला. याचा व्हिडीओ गायकाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिलजीतची डायलॉगबाजी पाहायला मिळत आहे. तसंच त्याने ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाबद्दल भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या सगळीकडे अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. हा सुपरहिट चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत अनेक रेकॉर्ड आपल्या नावे करत आहे. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाचं प्रेक्षकांना अक्षरशः वेड लागलं आहे. चित्रपटातील गाणी आणि डायलॉग सुपरहिट झाले आहेत. अशा हा सुपरहिट चित्रपटाचा उल्लेख दिलजीतने दोसांझने ( Diljit Dosanjh ) आपल्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये केला. तो नेमका काय म्हणाला? जाणून घ्या…

हेही वाचा – Pushpa 2 Box Office Collection Day 10: अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या कमाईत ७१ टक्क्यांनी वाढ, ‘जवान’ आणि ‘RRR’ चित्रपटाला टाकलं मागे

व्हिडीओच्या शेवटी दिलजीत दोसांझ ( Diljit Dosanjh ) पुष्पाच्या स्टाइलमध्ये ‘झुकेगा नही साला’ म्हणताना दिसत आहे. दिलजीत म्हणाला, “तुम्ही ‘पुष्पा’ चित्रपट पाहिला का? मी ‘पुष्पा’चा पहिला भाग बघितला आहे. खूप भारी आहे. पण ‘पुष्पा २’ अजून पाहिला नाही. पण पहिला ‘पुष्पा’ चित्रपट बघितला. त्यातला तो लोकप्रिय डायलॉग आहे ना, झुकेगा नही साला…ओके…साला नहीं झुकेगा तो क्या जिजा झुक जायेगा?

हेही वाचा – ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिषेक गावकरने लग्नानंतर बायकोचं नाव का बदललं? वाचा किस्सा

हेही वाचा – Video: ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडच्या वरातीत मराठी कलाकारांचा जबरदस्त डान्स, व्हिडीओ आला समोर

‘पुष्पा २’ चित्रपटाची कमाई

‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाने जगभरात १००० कोटींहून अधिक कमाई केली आहे. जगभरात सर्वात वेगाने कमाई करणारा चित्रपट ‘पुष्पा २: द रुल’ ठरला आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, आतापर्यंत भारतात या ८२४ कोटींचा गल्ला जमवला आहे. यातील ४९८ कोटी हिंदी व्हर्जनने कमावले आहेत. सध्या तेलुगू व्हर्जनपेक्षा हिंदीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाने एकूण कमाईत ‘जवान’ आणि ‘आरआरआर’सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singer diljit dosanjh talks about allu arjun pushpa 2 movie in chandigarh concert pps