Himesh Reshammiya Father Passed Away: बॉलीवूडमधील लोकप्रिय गायक व संगीतकार हिमेश रेशमियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील-संगीत दिग्दर्शक विपिन रेशमिया यांचं निधन झालं. बुधवारी (१८ सप्टेंबरला) त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८७ वर्षांचे होते.

विपिन रेशमिया यांना श्वासोच्छवासाच्या समस्या होत्या. तसेच वय जास्त असल्याने काही आरोग्य समस्या होत्या, त्यामुळे त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हिमेश जवळची मैत्रीण वनिता थापर हिने विपिन रेशमिया यांचे निधन झाल्याची पुष्टी केली आहे. “हो, त्यांना श्वासोच्छवासाशी संबंधित समस्या होत्या आणि ते कोकिलाबेन रुग्णालयामध्ये दाखल होते. बुधवारी रात्री साडेआठ वाजता त्यांचे निधन झाले,” अशी माहिती वनिताने इ-टाइम्सला दिली.

Vivek Oberoi shifted to Dubai
तीन वर्षांपूर्वी मुंबई सोडून दुबईत स्थायिक झाला बॉलीवूड अभिनेता; कारण सांगत म्हणाला, “मी भारतात…”
19th rashibhavishya in marathi
१९ सप्टेंबर पंचांग: वृद्धी योग राशीच्या कुंडलीत बदल…
aishwarya rai Bachchan daughter aaradhya Bachchan touches south superstar shiva Rajkumar feet take blessings video viral
Video: दाक्षिणात्य सुपरस्टार हात मिळवण्यासाठी पुढे आला पण आराध्याने…; ऐश्वर्या राय-बच्चनच्या लेकीच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष
govinda fan styed at his home as maid
“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Anil Mehta made last calls to Daughters Malaika Arora
“मी थकलोय…”, लेक मलायका अरोराला फोन करून आत्महत्येआधी काय म्हणाले होते अनिल मेहता? माहिती आली समोर
malaika arora father anil arora suicide
अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, इमारतीवरून उडी घेत संपवलं जीवन
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

तीन वर्षांपूर्वी मुंबई सोडून दुबईत स्थायिक झाला बॉलीवूड अभिनेता; कारण सांगत म्हणाला, “मी भारतात…”

हिमेशच्या मैत्रिणीने दिली निधनाची माहिती

“मी हिमेशची फॅमिली फ्रेंड आहे, आम्ही एका कुटुंबासारखेच आहोत. जेव्हापासून विपिन रेशमिया टीव्ही मालिकांची निर्मिती करत होते तेव्हापासून मी त्यांना ओळखते. मी त्यांना पप्पा म्हणायचे. नंतर ते संगीत दिग्दर्शक झाले, पुढे हिमेश त्यांच्या पावलावर पाऊल टाकत याच क्षेत्रात आला. आमचं नातं खूप जवळचं आहे,” असं वनिता म्हणाली. विपिन यांच्यावर आज १९ सप्टेंबर रोजी जुहूमध्ये अंत्यसंस्कार केले जातील.

८०० कोटींचा पतौडी पॅलेस रंगवण्याऐवजी सैफ अली खानने लावला चुना; सोहा अली खान म्हणाली, “आजोबांचे पैसे…”

विपिन रेशमिया यांनी ‘द एक्सपोज’ आणि ‘तेरा सुरूर’ साठी निर्माता म्हणून काम केलं होतं. विपिन यांनी १९९० मध्ये ‘इन्साफ का सूरज’ नावाच्या चित्रपटासाठी संगीत दिले होते. विपिन रेशमिया आणि सलमान खान एका चित्रपटात काम करणार होते, त्यानिमित्ताने हिमेशची भेट सलमान खानशी झाली. विपिन यांनी हिमेशची सलमानशी ओळख करून दिली होती. त्यानंतर हिमेशला सलमान आणि काजोलच्या १९९८ मध्ये आलेल्या ‘जब प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटात संगीत दिग्दर्शक म्हणून ब्रेक मिळाला होता.