भारतीय वंशाच्या ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान झाले. बुधवारी पंतप्रधान म्हणून त्यांचा पहिला दिवस होता. ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर देशभरातून त्यांच्यावर कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. खासकरून ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर भारतात खूपच उत्साहाचं वातावरण आहे. ऋषी सुनक पंतप्रधान झाल्यानंतर अनेक सेलिब्रेटींनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्यांना पंतप्रधान पदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
ऋषी सुनक पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देणाऱ्यांच्या यादीत आता प्रसिद्ध बॉलिवूड गायिका कनिका कपूरचंही नाव जोडलं गेलं आहे. गायिका कनिका कपूरने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती ऋषी सुनक यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधताना दिसत आहे.
आणखी वाचा-“देशातील सर्व मुस्लीम जेव्हा…” ऋषी सुनकसंबंधीत वादात विवेक अग्निहोत्रींची उडी
लंडनमधील फेअरमाँट विंडसर पार्क येथे चौथ्या वार्षिक यूके-इंडिया पुरस्कार वितरणाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्याचे मुख्य पाहुणे पंतप्रधान ऋषी सुनक होते. याच कार्यक्रमात, बॉलिवूड गायिका कनिका कपूर हिला यूके- भारत सांस्कृतिक संबंधातील योगदानाबद्दल विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. या खास प्रसंगी कनिका कपूरने ऋषी सुनक यांचीही भेट घेतली.
आणखी वाचा- Photos : वयाची ४०शी उलटली अन् लंडनमध्ये सुप्रसिद्ध गायिकेनं थाटामाटात केलं दुसरं लग्न, फोटो आले समोर
कनिका कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर ऋषी सुनक यांच्या भेटीचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती पंतप्रधानांशी बोलताना दिसत आहे. कनिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंपैकी एका फोटोमध्ये ती ऋषी सुनक यांच्याबरोबर पोज देताना दिसत आहे आणि दुसऱ्या फोटोमध्ये ते एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. हे फोटो पोस्ट करत तिने लिहिलं, ‘ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना भेटणे अभिमानास्पद होते.