प्रसिद्ध गायक सनम पुरीने लग्नगाठ बांधली आहे. सनम त्याची गर्लफ्रेंड झुचोबेनी तुंगोईसह लग्नबंधनात अडकला. दोघांचे लग्न नागालँडमध्ये झाले. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये सनम व झुचोबेनी खूप सुंदर दिसत आहेत. सनम व झुचोबेनी यांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले.
सनम पुरी ३१ वर्षांचा आहे, तर त्याची पत्नी झुचोबेनी तुंगोई त्याच्यापेक्षा ६ वर्षांनी लहान आहे, म्हणजेच ती २५ वर्षांची आहे. दोघांचेही कुटुंबीय आणि जवळचे लोक या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. सनम पुरीच्या फॅन पेजवरून लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत.
सनम पुरीच्या फॅन पेजवरून हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. फोटोंमध्ये झुचोबेनी पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये सुंदर दिसत आहे. तर सनम काळ्या रंगाच्या सूटमध्ये छान दिसत होता. या सोहळ्यात सनमचा भाऊ समर पुरीही स्टेजवर एकत्र उभा असल्याचं दिसत आहे.
नवीन संसार अन् मालिकेचं शूट कसं सांभाळतेय सुरुची अडारकर; म्हणाली, “माझा नवरा पियुष…”
सनम पुरीची पत्नी झुचोबेनी तुंगोई ही नागालँडची राजधानी कोहिमा येथील रहिवासी आहे. सनमने हिंदुस्तान टाईम्सला काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत लग्नाबद्दल सांगितलं होतं. त्यांचं लग्न पंजाबी व लोथा नागा पद्धतींनुसार होणार असल्याचं तो म्हणाला होता. सनम पुरीची पत्नी झुकोबेनी ही सनमच्या बँडचा एक भाग आहे. ती त्याच्यासोबत गाणी गाते आणि संगीत उद्योगाचा भाग आहे. त्यांच्या लग्नातील लोथा नागा पद्धतीने पार पडलेल्या कार्यक्रमाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
कामाबद्दल बोलायचं झाल्यास सनम पुरी ‘धत तेरी की’, ‘इश्क बुलावा’ यासारख्या गाण्यांसाठी ओळखला जातो. तो ‘सनम’ नावाच्या पॉप-रॉक बँडचा मुख्य गायकही आहे. सनमला वैवाहिक जीवनासाठी चाहते शुभेच्छा देत आहेत.