सोमवारी एका म्यूझिक कॉन्सर्टमध्ये गायक सोनू निगमवर हल्ला झाला होता. सेल्फी घेत असताना बाचाबाची झाली आणि त्यानंतर सोनूवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सोनू निगमचा बॉडीगार्ड आणि मित्र गायक रब्बानी खान यांना दुखापत झाली. आता या प्रकरणावर सिंगर राइट्स असोसिएशननेही प्रतिक्रिया गिली आहे. याचबरोबर गायक शानने सोनू निगमवर झालेल्या हल्ल्याबाबत संताप व्यक्त केला आहे. हे कॉन्सर्ट चेंबूरमध्ये सुरू होतं. आता शानने सेलिब्रेटींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

शानने इंडियन सिंगर्स राइट्स असोसिएशनचं अधिकृत पत्र शेअर केलं आहे. तो म्हणाला, “असा त्रास पाहून मला खूप दुःख झालं आहे. तेही मुंबईत अशी घटना घडली. जे शहर कायदा व्यवस्था आणि सुरक्षेसाठी ओळखलं जातं. एका व्यक्तीने असं धाडस केलं जे अजिबात चांगलं नाही. मी प्रशासनाला विनंती करतो की, असा दुर्व्यवहार आणि हिंसेच्या विरोधात कठोर पाऊल उचलून अपराध्यांना शिक्षा करा.”

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sai Pallavi reacts on turning vegetarian for Sita role in Ramayana
‘रामायण’ सिनेमासाठी मांसाहार सोडल्याचे वृत्त पाहून भडकली साई पल्लवी; कायदेशीर कारवाईचा इशारा देत म्हणाली…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”

आणखी वाचा- “हिला तर नुसती फॅशन…”, एअरपोर्टवरील ‘त्या’ व्हिडीओमुळे ट्रोल झाली कियारा अडवाणी

या पत्रात लिहिलं आहे की, ‘चेंबूरमध्ये काल रात्री म्यूझिक कॉन्सर्टमध्ये गायक सोनू निगम आणि त्याच्या टीमवर हल्ला झाल्याचं समजल्यानंतर खूप दुःख झालं. एका कलाकारावर अशाप्रकारे हल्ला झाला ही खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. या घटनेने सर्वनंतर देशभरातील सगळेच गायक चिंतीत आहेत. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांनी यात गांभीर्याने लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्याची मागणी करत आहोत. जेणेकरून देशातल्या कोणत्याही कलाकाराबरोबर अशाप्रकारची घटना पुन्हा घडणार नाही.’

आणखी वाचा- Video : “धक्का दिला, अंगावर धावून गेला आणि…” सोनू निगमला झालेल्या धक्काबुक्कीचा नवा व्हिडीओ समोर

दरम्यान सोमवारी एका कार्यक्रमात सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात सोनू निगम आणि त्याच्या टीमबरोबर धक्काबुक्की करण्यात आली. त्याच्या टीमचा सदस्य आणि गायक रब्बानी खानला पायऱ्यांवरून खाली फेकण्यात आलं. त्यावेळी तो दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न करत होता. ती व्यक्ती सेल्फीसाठी सोनू निगमला पोज देण्यास जबरदस्ती करत होती असं बोललं जातंय. सोनू निगमने याबाबत मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे.

Story img Loader