भारतात सगळीकडे ईदचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. ईदनिमित्त मुस्लिम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बॉलीवूडच्या अनेक कलाकरांनी सोशल मीडियावर चाहत्यांना ‘ईद मुबारक’ म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. प्रसिद्ध गायक शाननेही चाहत्यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, शानच्या या शुभेच्छा नेटकऱ्यांना आवडलेल्या दिसत नाहीत. नेटकऱ्यांनी शानच्या या पोस्टवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा- Video: बायकोची चप्पल उचलणं रणबीर कपूरला पडलं महागात; नेटकरी भडकले म्हणाले, “मुर्ख..”
शाननं शेअर केलेल्या फोटोत तो डोक्यावर टोपी घालून नमाज पढताना दिसत आहे. शानने फोटो शेअर करत कॅप्शन लिहिलं आहे, ”तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला ईद मुबारक..” मात्र, या फोटोवरुन नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट करत लिहिलं होतं,’हा मुसलमान कधीपासून झाला..’, मला वाटलं की हा बंगाली आहे’. तर एकानं लिहिलं की,’शुभेच्छा द्यायच्या फक्त.. हे करायची गरज काय होती. कोणत्या मुसलमानानं कधी डोक्यावर टिळा लावून शुभेच्छा दिल्यात का कधी?उलट असं करून हा चुकलाच आहे’. काही लोकांनी तर मुद्दामहून शानला जय परशुराम आणि अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा दिल्या आहे.
यानंतर शाननं फोटोबाबत स्पष्टीकरण देताना लिहिलं आहे की,”आज ईद आहे. मी ३ वर्षापूर्वी एक व्हिडीओ केला होता. पलाश मुच्छलसाठी मी तो व्हिडीओ केला होता. ‘करम कर दे..’ असं त्याचं नाव होतं. त्यामध्ये असा लूक होता. मी विचार केला की ईद या सणाबाबत पोस्ट करण्यासाठी हा फोटो एकदम योग्य आहे…बस एवढीशी गोष्ट
हेही वाचा- “ए मस्क भैया, तू चीज बडी है..”; ब्ल्यू टिक पुन्हा मिळताच बिग बींचा आनंद गगनात मावेना; रात्री १ वाजता एलॉन मस्कसाठी गायलं गाण
शानने स्पष्टीकरण देणार एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे. ” प्रत्येक धर्माचा सम्मान करायला मला शिकवलं आहे. हीच माझी विचारसरणी आहे आणि ही प्रत्येक हिंदुस्थानी माणसाची विचारसरणी असायला हवी. बाकी तुमची विचार करण्याची पद्धत तुमच्याकडेच राहू दे”. त्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये शानने ‘जय परशुराम’ देखील लिहिले आहे.