हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून निवडून आलेल्या नवनिर्वाचित खासदार कंगना रणौत यांना गुरुवारी चंदीगड विमानतळावर सीआयएसएफ कॉस्टेबर कुलविंदर कौरने कानशिलात लगावली. यावेळी कंगना चंदीगढहून दिल्लीला जात होत्या. पण त्यांनी शेतकऱ्यांसंदर्भात वक्तव्य केल्यामुळे कुलविंदर कौर व कंगनात वाद सुरू झाले आणि यावेळीच अभिनेत्रीच्या कानशिलात दिल्याचा प्रकार घडला. सध्या या प्रकरणावर बॉलीवूड सेलिब्रिटी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काही सेलिब्रिटींनी कंगना यांना पाठिंबा दर्शवला आहे. पण प्रसिद्ध संगीतकार, गायक विशाल ददलानीने स्वतःची एक वेगळी भूमिका याविषयी मांडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशाल ददलानीने इन्स्टाग्राम स्टोरीवर या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आणि लिहिलं, “मी कधीच हिंसेचं समर्थन करत नाही, पण या सीआयएसएफ कर्मचाऱ्याचा राग मी समजू शकतो. सीआयएसएफने तिच्यावर कोणतीही कारवाई झाल्यास, तिला काम मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेन. जय हिंद. जय जवान. जय किसान.” तसंच त्यानं पुढच्या स्टोरीमध्ये लिहिलं होतं, “जर मिस कौरला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं असेल, तर कृपया कोणीतरी तिचा माझ्याशी संपर्क करून द्या आणि मी तिला नोकरी मिळेल याची खात्री करेन.”

हेही वाचा – ‘देवयानी’ फेम अभिनेत्याची ६ वर्षांनंतर ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत दमदार एन्ट्री, झळकणार महत्त्वाच्या भूमिकेत

विशाल ददलानीच्या याच भूमिकेवरून प्रसिद्ध गायिका सोना मोहपात्रा एक्सवर पोस्ट करत म्हणाली, “एखाद्या चुकीच्या गोष्टींविरोधात भूमिका घेणारा तो (विशाल ददलानी) अनेक आरोप असलेल्या गैरवर्तन करणाऱ्या अनु मलिकसारख्या लोकांच्या शेजारी बसतो आणि जेव्हा माझ्यासारखे सहकारी त्याला रिअ‍ॅलिटी शोच्या टॉक्सिक कल्चरबद्दल बोलायला सांगतात. तेव्हा म्हणतो, पैसे कमवून देशातून निघायचं आहे.”

हेही वाचा – ‘येड लागलं प्रेमाचं’ने लोकप्रिय मालिकांना मागे टाकत TRP मध्ये मारली बाजी, ‘अबीर गुलाल’ मालिका ‘या’ क्रमांकावर

दरम्यान, कंगना रणौत यांना सीआयएसएफ कॉस्टेबर कुलविंदर कौर यांनी लगावलेल्या कानशिल प्रकरणात अभिनेत्री रवीना टंडन पासून शबाना आझमीपर्यंत सगळ्यांनी अभिनेत्रीला पाठिंबा दिला आहे. याशिवाय कंगना यांचा एक्स बॉयफ्रेंड अध्ययन सुमनने याप्रकरणी भाष्य केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singer sona mohapatra slams on vishal dadlani for supporting cisf constable kulwinder kaur in kangana ranaut slap controversy pps