Sonu Nigam : प्रसिद्ध गायक सोनू निगम त्याच्या गाण्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याने अनेक चित्रपटांना सुपर हिट गाणी दिली आहेत. त्याच्या गाण्यांचे सर्व जण कौतुक करतात. सोनू निगम आता राजकीय नेत्यांवर काहीसा नाराज झाला आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करीत याबद्दल मनातील खदखद व्यक्त केली आहे.

सोमवारी ‘रायजिंग राजस्थान’ कार्यक्रमात सोनू निगम आला होता. त्यावेळी त्याच्या गाण्यांचा प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमात अनेक प्रमुख पाहुणे उपस्थित होते. त्यात काही राजकीय नेत्यांनीसुद्धा हजेरी लावली होती. यावेळी घडलेल्या एका घटनेमुळे सोनू निगम राजकीय नेत्यांवर नाराज झाला आहे.

Priyanka Gandhi On Narendra Modi
Priyanka Gandhi : “असे रडणारे नेते कधीही पाहिले नाहीत”, प्रियांका गांधींचं पंतप्रधान मोदी, केजरीवालांना जोरदार प्रत्युत्तर
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
बीड राष्ट्रवादीमध्ये अजितदादांच्या इशाऱ्यानंतर ‘साफसफाई’ होणार का ?
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
Dhananjay Munde Beed Guardian Minister
Dhananjay Munde: “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला तर…”, दिल्लीमध्ये भेटीगाठी घेतल्यानंतर धनंजय मुंडे काय म्हणाले?
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare
Bharatshet Gogawale : पालकमंत्रिपदाचा वाद विकोपाला? “…तर मंत्रिपदाचा राजीनामा देतो”, भरत गोगावलेंचं सुनील तटकरेंना खुलं आव्हान
Chandrakant Patil on Dhananjay Munde
Chandrakant Patil: “… तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील”, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

हेही वाचा : Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”

व्हिडीओमध्ये त्याने म्हटले, “राजस्थानचं नाव दुमदुमत राहावं यासाठी या कार्यक्रमात संपूर्ण जगभरातील अनेक मोठ्या व्यक्ती आल्या होत्या. तेथे मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्री उपस्थित होते. बऱ्याच व्यक्ती होत्या; पण मला अंधारात व्यवस्थित दिसल्या नाहीत.”

व्हिडीओमध्ये पुढे सोनूने काही व्यक्तींच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली. “शो सुरू असताना मी पाहिलं की, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकारी कार्यक्रम सुरू असतानाच निघून गेले. त्यांच्यानंतर त्यांच्याबरोबर आलेले काही प्रतिनिधीदेखील निघून गेले. त्यामुळे सर्व राजकीय नेत्यांना माझं एक निवेदन आहे की, तुम्हीच तुमच्या कलाकारांचा आदर नाही करणार, तर बाहेरच्या व्यक्ती कसे करतील. असं तर मी कधी पाहिलं नाही की, अमेरिकेत एखादा कलाकार त्याची कला सादर करत आहे आणि तेथील राजकीय व्यक्ती तेथून निघून गेल्यात. त्यामुळे माझी तुम्हाला अशी विनंती आहे की, तुम्ही कार्यक्रमात एक तर येऊ नका आणि आलात, तर जायचे असल्यास शो सुरू होण्याआधीच निघून जा. कार्यक्रम सुरू असताना असं उठून जाणं हा सरस्वतीचा अपमान आहे”, असं सोनू निगम म्हणाला.

“या गोष्टीकडे खरं तर माझं लक्ष नव्हतं गेलं. मात्र, काही वेळानं मला अनेक व्यक्तींचे मेसेज आले. तुम्ही अशा ठिकाणी कार्यक्रम करू नका, असं मला काहींनी सांगितलं. त्यामुळे माझं तुम्हाला निवेदन आहे. मला माहीत आहे तुम्हाला भरपूर कामं असतात आणि तुम्ही फार जास्त व्यग्र असता. त्यामुळे एका कार्यक्रमात बसून तुम्ही तुमचा वेळ वाया नाही घालवला पाहिजे”, असंही सोनू निगम म्हणाला.

हेही वाचा : ज्येष्ठ अभिनेत्याने मुलगा अन् सूनेविरोधात दिली तक्रार; मुलानेही वडिलांवर केले आरोप

तसेच या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, “देशातल्या सर्व सन्माननीय राजकीय नेत्यांना विनम्र निवेदन आहे की, कृपया तुम्हाला मधेच उठून जायचं असेल, तर कोणत्याही कलाकाराच्या कार्यक्रमाला येऊ नका. कारण- हा कला, कलाकार आणि सरस्वतीमातेचा अपमान आहे.”

Story img Loader