उदित नारायण हे लोकप्रिय बॉलीवूड गायक आहेत. त्यांचे लाखो चाहते आहेत. उदित नारायण गायनाचे अनेक शो करत असतात. अशाच एका शोमधील त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी उदित यांच्या कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ६९ वर्षीय उदित नारायण यांच्यावर टीका केली आहे.
उदित नारायण त्यांच्या नवीन व्हिडीओमुळे वादात साडपले आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले आहेत. उदित नारायण यांचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एका लाइव्ह कॉन्सर्टचा आहे. या व्हिडीओत उदित नारायण त्यांच्या महिला चाहत्यांना किस करताना दिसत आहेत. त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी आलेल्या महिला चाहत्यांबरोबर फोटो काढल्यानंतर त्यांनी किस केले. त्यापैकी एका चाहतीच्या ओठावर त्यांनी किस केले. कॉन्सर्टमधील हा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला असून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.
उदित नारायण यांचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की उदित स्टेजवर ‘टिप टिप बरसा पानी’ हे गात आहेत आणि चाहते त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी येत आहेत. पुरुष आणि महिला चाहते तिथे येतात. मग उदित स्टेजवरून पुढे येतात आणि महिलांबरोबर सेल्फी काढतात आणि त्यांच्या गालावर किस करतात. एका चाहतीने त्यांना गालावर किस केल्यावर ते तिच्या ओठांवर किस करतात, हा व्हिडीओ पाहून लोक नाराजी व्यक्त करत आहेत.
पाहा व्हिडीओ –
‘मला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये, उदित नारायण यांनी हे कृत्य केले,’ ‘आपण या सेलिब्रिटींची पूजा करतो आणि ते असे वागतात,’ ‘अश्लील कृत्य’, ‘या गायकांची रिअॅलिटी आता समोर येत आहे,’ अशा प्रकारच्या कमेंट्स या व्हिडीओवर आहेत.
अभिनेता केआरकेने उदित नारायण यांचा हा व्हिडीओ एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) शेअर केला असून त्यांच्यावर कारवाई व्हावी, असं म्हटलं आहे.