हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार व प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत यांना एका सीआयएसएफ महिला सुरक्षारक्षकाने कानशिलात लगावली. गुरुवारी चंदीगढ विमानतळावर ही घटना घडली. कंगना यांना मारणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचे नाव कुलविंदर कौर आहे. कुलविंदरला निलंबित करण्यात आलं आहे. अशातच तिला बॉलीवूडमधून कामाची ऑफर देण्यात आली आहे.
गायक व संगीतकार विशाल ददलानीने शुक्रवारी त्याच्या इन्स्टाग्रामवर या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलं, “मी कधीच हिंसेचं समर्थन करत नाही, पण या सीआयएसएफ कर्मचाऱ्याचा राग मी समजू शकतो. सीआयएसएफने तिच्यावर कोणतीही कारवाई झाल्यास, तिला काम मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेन. जय हिंद. जय जवान. जय किसान.”
यानंतर विशालने दुसरी एक स्टोरी पोस्ट केली, ज्यात त्याने लिहिलं, “जर मिस कौरला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं असेल, तर कृपया कोणीतरी तिचा माझ्याशी संपर्क करून द्या आणि मी तिला नोकरी मिळेल याची खात्री करेन.”
कुलविंदर कौरने कंगना रणौत यांना मारल्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आले आणि तिला तात्काळ निलंबित करण्यात आले. कौरच्या निलंबनाबद्दल कलाल्यावर विशाल ददलानीने आणखी काही पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीजवर केल्या. “जे कोणी डुंगनाच्या (कंगना) बाजूने आहेत, जर त्यांना तिने म्हटलं असतं की तुमची आई ‘१०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे’ तर तुम्ही काय कराल?”
आणखी एका स्टोरीत विशालने लिहिलं की कंना रणौत यांना फोन स्कॅनिंग करण्यास सांगितलं होतं, पण त्यांनी नकार दिला कारण आता त्या खासदार आहेत. त्यामुळे हा सगळा वाद सुरू झाला होता.
कंगना रणौत यांनी बॉलीवूडकरांवर व्यक्त केलेली नाराजी
चंदीगढ विमानतळावर घडलेल्या घटनेबद्दल कंगना रणौत यांना बॉलीवूडमधून कुणाचाही पाठिंबा मिळाला नाही, त्याबद्दल तिने नाराजी व्यक्त केली होती. बॉलीवूडचा उल्लेख करत केलेली पहिली पोस्ट तिने काही वेळातच डिलीट केली आणि मग दुसरी पोस्ट केली होती.
Video: कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावणाऱ्या कुलविंदर कौरला बक्षीस देणार, व्यावसायिकाने केली घोषणा
“‘ऑल आइज ऑन राफाह’ गँग हे तुमच्याबरोबर आणि तुमच्या मुलांबरोबरही घडू शकतं. जेव्हा तुम्ही एखाद्यावर झालेला दहशतवादी हल्ला सेलिब्रेट करता तेव्हा तुमच्याबरोबरही हे घडेल, त्या दिवसासाठी तयार राहा,” असं त्यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिलं होतं.
पार्किंगचा वाद अन् भररस्त्यात बाचाबाची; रवीना टंडनने प्रकरणावर सोडलं मौन, म्हणाली, “आता…”
कंगना रणौत यांना मारल्यावर काय म्हणाली होती कुलविंदर कौर
दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या महिला प्रत्येकी १०० रुपये घेऊन तिथे बसल्या आहेत, असं कंगना म्हणाल्या होत्या. तसेच कंगना यांनी शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हटलं होतं. एका व्हिडीओत कुलविंदर म्हणते की, शेतकरी आंदोलनादरम्यान कंगना यांनी म्हटलं होतं की त्या महिला १०० रुपयांसाठी आंदोलन करत होत्या. कंगना तिथे बसू शकल्या असत्या का? कंगना यांनी जेव्हा हे वक्तव्य केलं होतं, तेव्हा आपली आई तिथे आंदोलन करत होती, असं तिने म्हटलं.