Singham Again And Bhool Bhulaiyaa 3 Box Office Collection Day 2 : दिवाळीच्या मुहूर्तावर बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘सिंघम अगेन’ आणि ‘भुल भुलैया ३’ चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहेत. एका चित्रपटाची अ‍ॅक्शन आणि दुसऱ्या चित्रपटातील हॉरर कॉमेडी ड्रामा प्रेक्षकांचा चांगला पसंतीस पडला आहे. बॉक्स ऑफिसवर ‘सिंघम अगेन’ आणि ‘भुल भुलैया ३’ चित्रपटांमध्ये काटे की टक्कर सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ ( Singham Again ) २०११मध्ये सुरू झालेल्या सिंघम फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट आहे. यावेळी ‘सिंघम अगेन’मध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन आहे. तसंच महत्त्वाच म्हणजे अजय देवगणसह बॉलीवूडची सुपरहिट स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. अजयसह करिना कपूर, अक्षय कुमार, रणवीर सिंह, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या जबरदस्त ट्रेलरनंतर प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढली होती. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर ‘सिंघम अगेन’ चित्रपटाचा धुमाकूळ सुरू आहे. ‘भुल भूलैया ३’ चित्रपटापेक्षा ‘सिंघम अगेन’ची घौडदोड जोरदार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Video: ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकरांचा दिवाळी स्पेशल Reel व्हिडीओ पाहिलात का? नेटकरी करतायत कौतुक

अनीस बज्मी दिग्दर्शित ‘भुल भूलैया ३’ चित्रपट २००७मध्ये सुरू झालेल्या ‘भुल भूलैया’ फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट आहे. हॉरर कॉमेडी असलेल्या ‘भुल भूलैया ३’ चित्रपटात कार्तिक आर्यनसह विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी प्रमुख भूमिकेत झळकले आहेत. बॉक्स ऑफिसवर ‘भुल भूलैया ३’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पण ‘सिंघम अगेन’च्या ( Singham Again ) तुलनेत ‘भुल भूलैया ३’ पिछाडीवर असल्याचं दिसत आहे.

हेही वाचा – Video: ‘नवरा माझा नवसाचा २’ची जोरदार सक्सेस पार्टी, सचिन पिळगांवकरांनी सुप्रिया यांच्यासह ‘सत्या’ चित्रपटातील गाण्यावर केला जबरदस्त डान्स

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, दुसऱ्या दिवशी कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने ३६.५ कोटींची कमाई केली आहे. तर तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘सिंघम अगेन’ने ४१.५ कोटींचा गल्ला जमवला आहे. पहिल्या दिवशीदेखील ‘सिंघम अगेन’ने ( Singham Again ) ‘भूल भुलैया ३’पेक्षा अधिक कमाई केली होती. ‘सिंघम अगेन’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ४३.५ कोटी तर ‘भुल भूलैया ३’ चित्रपटाने ३५.५० कोटींची कमाई केली होती. त्यामुळे आतापर्यंत ‘सिंघम अगेन’ चित्रपटाने एकूण ८५ कोटींची कमाई केली असून लवकरच १०० कोटींच्या घरात जाणार आहे. तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने दोन दिवसांत एकूण ७२ कोटींचा गल्ला जमवला आहे.

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम निक्की तांबोळी-अरबाज पटेलने दिवाळीनिमित्ताने शेअर केला खास व्हिडीओ, राखी सावंतच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

दरम्यान, ‘सिंघम अगेन’ ( Singham Again ) चित्रपटाने पहिल्या ‘सिंघम’ आणि दुसऱ्या ‘सिंघम रिटर्न्स’ चित्रपटाला कमाईत मागे टाकलं आहे. रोहित शेट्टीच्या २०११मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सिंघम’ने पहिल्या दिवशी ८ कोटींची कमाई केली होती आणि पहिल्या आठवड्यात ३१ कोटींचा गल्ला जमवला होता. तसंच २०१४मधील ‘सिंघम रिटर्न्स’ने पहिल्या दिवशी ३२ कोटींची कमाई केली होती. तर पहिल्याच आठवड्यात ७७ कोटींचा व्यवसाय केला होता. या दोन्ही चित्रपटाच्या तुलनेत ‘सिंघम अगेन’ पहिल्याच आठवड्यात १०० कोटींहून अधिक कमाई करू शकतो.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singham again and bhool bhulaiyaa 3 movie second day collection pps