Singham Again Box Office Collection Day 5 : रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. यामध्ये अजय देवगण, करीना कपूर खान, अर्जुन कपूर, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर, सिनेमात अक्षय कुमार आणि सलमान खान यांचे कॅमिओ देखील आहेत. रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा हा बिग बजेट सिनेमा १ नोव्हेंबर रोजी म्हणजेच दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

‘सिंघम अगेन’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी ४३.५ कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी हा आकडा ४२.५ कोटींवर पोहोचला. त्यानंतर रविवारी ( तिसरा दिवस ) ‘सिंघम अगेन’ने ३५.७५ कोटींची कमाई केली. रोहित शेट्टीचा हा सिनेमा मंडे टेस्टमध्ये देखील पास झाला. चौथ्या दिवशी या चित्रपटाने जवळपास १८ कोटी तर, पाचव्या दिवशी १३.५० कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे चित्रपटाचं एकूण कलेक्शन पाहता ‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार आतापर्यंत भारतात या सिनेमाने तब्बल १५३.२५ कोटी कमावले आहेत.

हेही वाचा : दिवाळीनिमित्त सूरजच्या गावी पोहोचले Bigg Boss Marathi 5 मधले ‘हे’ सदस्य! फोटो आला समोर, नेटकरी म्हणाले, “तुमची दोस्ती…”

चित्रपटाचं बजेट किती?

‘सिंघम अगेन’ने ( Singham Again ) जगभरात एकूण २०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला हा सिनेमा खऱ्या अर्थाने ब्लॉकबस्टर ठरला आहे. अजय देवगणच्या करिअरमधला हा सर्वात सुपरहिट चित्रपट ठरला आहे. रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधला हा पाचवा चित्रपट आहे. यापूर्वी सिंघम ( २०११ ), सिंघम रिटर्न्स ( २०१४ ), सिम्बा ( २०१८ ), सूर्यवंशी ( २०२१ ) असे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार ‘सिंघम अगेन’ ( Singham Again ) चित्रपटाचं एकूण बजेट ३५० ते ३७५ कोटी आहे. ही आकडेवारी गाठण्यासाठी चित्रपटाने आणखी १५० कोटींची कमाई करणं आवश्यक आहे. याशिवाय हा चित्रपट अजय देवगणच्या आयुष्यातील हा सर्वाधिक कमाई करणार चित्रपट ठरला आहे.

हेही वाचा : गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा अन्…; ‘फँड्री’तील जब्या-शालूचा नवा फोटो चर्चेत; नेटकरी म्हणाले, “खरंच लग्न झालं का…”

दरम्यान, यंदा दिवाळीत बॉक्स ऑफिसवर ‘सिंघम अगेन’ ( Singham Again ) आणि ‘भुल भुलैय्या ३’ या चित्रपटांचा क्लॅश झाल्याचं पाहायला मिळालं. अजय देवगणचा चित्रपट कार्तिक आर्यनवर वरचढ ठरला आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर ‘सिंघम अगेन’ने १५३ कोटींहून अधिक तर, ‘भुल भुलैय्या ३’ने १३७ कोटींहून अधिक कमाई केली आहे.