रोहित शेट्टी दिग्दर्शित चित्रपट सिंघम अगेन दिवाळीच्या मुहूर्तावर सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिस गाजवलं आहे. शुक्रवारी (१ नोव्हेंबरला) चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची आकडेवारी समोर आली आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर २०२४ मधील दोन सर्वात मोठ्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. ‘सिंघम अगेन’ आणि ‘भूल भुलैया 3’ या दोन्ही चित्रपटांची रिलीज होण्याआधीच चांगलीच चर्चा होती. त्यामुळे दोन्ही चित्रपटांचे अॅडव्हान्स बुकिंगही दमदार झाले होते. मात्र, प्री-तिकीट विक्रीच्या शर्यतीत कार्तिक आर्यनचा चित्रपट १७ कोटींहून अधिक कमाई करून अजय देवगणच्या चित्रपटापेक्षा पुढे राहिला होता. तर सिंघम अगेनने १५ कोटी कमावले होते.

singham again movie box office collection this marathi writer writes story
मराठी लेखकाने लिहिलीये Singham Again ची कथा! वीकेंडची कमाई पाहून म्हणाला, “रोहित शेट्टी सर…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
biggest Flop bollywood Movie of 2024
बॉलीवूड कलाकारांची फौज, तब्बल ३५० कोटींचे बजेट; मात्र चित्रपट ठरला सुपरफ्लॉप, कमावले फक्त…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Singham Again Box Office Collection Day 5
‘सिंघम अगेन’ चित्रपटाने अवघ्या ५ दिवसांत कमावले तब्बल ‘इतके’ कोटी, या मल्टिस्टारर सिनेमाचं एकूण बजेट किती? जाणून घ्या…
Bhool Bhulaiyaa 3 Box Office Collection Day 1
Bhool Bhulaiyaa 3 ठरला कार्तिक आर्यनचा सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट, पहिल्या दिवशी कमावले तब्बल…
Rohit Shetty Singham Again movie Circus of entertainment news
मनोरंजनाची सर्कस

हेही वाचा – Bhool Bhulaiyaa 3 ठरला कार्तिक आर्यनचा सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट, पहिल्या दिवशी कमावले तब्बल…

‘सिंघम अगेन’ची पहिल्या दिवसाची कमाई

पहिल्या दिवसाच्या कमाईच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास ‘सिंघम अगेन’ने बाजी मारली आहे. ‘सिंघम अगेन’ची पहिल्या दिवसाची कमाई ‘भूल भुलैया 3’ पेक्षा जास्त आहे. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘सिंघम अगेन’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी ४३.५० कोटी रुपये कमावले आहेत. हे सुरुवातीचे आकडे आहेत, अधिकृत आकडे आल्यानंतर यात बदल होऊ शकतो.

singham again box office collection
सिंघम अगेन बॉक्स ऑफिस कलेक्शन (फोटो – इन्स्टाग्राम)

रोहित शेट्टीचा कॉप युनिव्हर्स चित्रपट ‘सिंघम अगेन’ ला रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात अजय देवगण व करीना कपूर खान मुख्य भूमिकेत आहेत. अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि टायगर श्रॉफ यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अर्जुन कपूर ‘सिंघम अगेन’मध्ये खलनायकाची भूमिका साकारत आहे, तर सलमान खानने या कॉप युनिव्हर्स चित्रपटात चुलबुल पांडे या त्याच्या भूमिकेसह एक विशेष कॅमिओ केला आहे. या तगड्या स्टारकास्टने प्रेक्षकांचे पहिल्याच दिवशी थिएटरमध्ये मनोरंजन केले आणि ‘भूल भुलैया 3’ला मागे टाकत ‘सिंघम अगेन’ने बॉक्स ऑफिसवर बाजी मारली.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची पत्नी काय काम करते? प्राजक्ताचे शिक्षण किती? म्हणाली, “मी ९ वर्षांपासून…”

‘भूल भुलैया 3’चे कलेक्शन

Bhool Bhulaiyaa 3 Box Office Collection Day 1 : ‘भूल भुलैया 3’ ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी ३५.५० कोटींची कमाई केली. हा कार्तिक आर्यनचा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

Story img Loader