सध्या रोहित शेट्टी त्याच्या ‘सिंघम अगेन’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. करीना कपूर खान व्यतिरिक्त अजय देवगण आणि अक्षय कुमार यांनीही यासाठी चित्रीकरण सुरू केले आहे. काहीच दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या मुहूर्ताचे फोटोज रोहित शेट्टी व सिंघमच्या सगळ्या कलाकारांनी शेअर केले होते. मीडिया रिपोर्टनुयार रोहित शेट्टी सध्या हैदराबादमध्ये ‘सिंघम अगेन’च्या क्लायमॅक्सचे शूटिंग करत आहे.

हा क्लायमॅक्स अॅक्शननी पुरेपूर भरलेला असणार आहे जो प्रेक्षकांना खिळवून ठेवेल असं सांगितलं जात आहे. मीडिया रीपोर्टनुसार फक्त क्लायमॅक्ससाठी दिग्दर्शक रोहित शेट्टीने २५ कोटी खर्च केले असल्याचं सांगितलं जात आहे.

Tula Shikvin Changlach Dhada
Video: “सूनबाई जर…”, भुवनेश्वरीमुळे अधिपतीला भेटण्याची अक्षराची इच्छा अपूर्ण राहणार का? मालिकेत पुढे काय घडणार?
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Dhoom 4
रणबीर कपूरच्या ‘धूम ४’मध्ये खलनायक कोण असणार? दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी लागण्याची शक्यता
IMDB most anticipated movie
२०२५ मध्ये ‘या’ २० चित्रपटांची सिनेप्रेमींना आहे प्रतीक्षा, सलमान खान पासून ते अक्षय कुमार पर्यंत ‘या’ स्टार्सच्या सिनेमांचा आहे समावेश
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
premachi goshta 2
मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
Muramba
Video: एकीकडे माही रमाचे रूप घेणार, तर दुसरीकडे रमा जिवंत…; ‘मुरांबा’ मालिकेत नवीन वळण
Huppa Huiyya 2 announcement
ठरलं! १५ वर्षांनी येणार मराठी चित्रपट ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल, दिग्दर्शकाने केली घोषणा

आणखी वाचा : “मी अ‍ॅडल्ट चित्रपटच बनवणार कारण…” ट्रॉलर्सना एकता कपूरचं सडेतोड उत्तर

‘कोइमोई’च्या रिपोर्टनुसार ‘सिंघम अगेन’चा क्लायमॅक्स एका ग्रँड लेवलवर शूट होणार आहे. इतकंच नव्हे तर या क्लायमॅक्समध्ये अजय देवगण, अक्षय कुमार व रणवीर सिंह याच्यासह अर्जुन कपूर व टायगर श्रॉफही दिसायची शक्यता वर्तवली जात आहे. तर करीनाबरोबरच दीपिका पदूकोणसुद्धा या क्लायमॅक्समध्ये दिसण्याची शक्यता आहे.

‘सिंघम अगेन’मध्ये अभिनेता अर्जुन कपूर हा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘सिंघम अगेन’चा क्लायमॅक्स हा पूर्णपणे हटके असणार आहे ज्याकडे एक स्वतंत्र चित्रपट म्हणूनही पाहता येऊ शकतं असं चित्रपटाशी जोडलेल्या काही कलाकारांनी सांगितलं आहे. यामुळेच २५ कोटींचं अवाढव्य बजेट असलेला ‘सिंघम अगेन’चा क्लायमॅक्स खास ठरणार हे मात्र नक्की.

‘सिंघम अगेन’ पुढील वर्षी १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी अल्लू अर्जुनचा बहुचर्चित ‘पुष्पा २’सुद्धा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी १५ ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर साऊथ विरुद्ध नॉर्थ असा जबरदस्त मुकाबला पाहायला मिळणार आहे अन् यासाठी चाहते चांगलेच उत्सुक आहेत.

Story img Loader