Singham Again Box Office Collection : बॉलीवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा पहिला भाग २०११ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यानंतर ‘सिंघम रिटर्न्स’ २०१४ मध्ये प्रदर्शित झाला. त्यामुळे ‘सिंघम अगेन’च्या प्रदर्शनाकडे चाहते अनेक वर्षांपासून डोळे लावून बसले होते. मध्यंतरीच्या काळात ‘सिंबा’, ‘सूर्यवंशी’ हे रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधले सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सिंघम अगेन’च्या ट्रेलरमध्येच यात दमदार कलाकारांची मांदियाळी असल्याचं स्पष्ट झालं होतं. याचा जवळपास पाच मिनिटांचा ट्रेलर सर्वांसाठी मनोरंजक ठरला होता. हा चित्रपट रामायणाच्या कथानकावर आधारलेला आहे. त्यात हा मल्टिस्टारर सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाल्यामुळे ‘सिंघम अगेन’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट

‘सिंघम अगेन’ची ( Singham Again ) कथा मराठमोळा लेखक क्षितीज पटवर्धनने लिहिली आहे. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने माहिती दिली होती. पहिल्याच वीकेंडला सिनेमाने जवळपास १२५ कोटी कमावल्याची पोस्ट क्षितीजने शेअर केली आहे. त्याच्यासाठी हा सिनेमा खऱ्या अर्थाने ड्रीम प्रोजेक्ट ठरला आहे.

“हे झालंय ते भारी आहे, आणि आयुष्यभर लक्षात राहणार आहे! रोहित शेट्टी सर तुम्हाला प्रचंड प्रेम आणि खूप खूप अभिनंदन!” अशी पोस्ट क्षितीज पटवर्धनने शेअर केली आहे. नेटकऱ्यांनी देखील या लेखकाचं भरभरून कौतुक केलं आहे.

हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांकडे गृहखातं, तर तुकोबा अर्थमंत्री…; संकर्षण कऱ्हाडेची राजकीय कवितेतून पांडुरंगाला साद, व्हिडीओ व्हायरल

‘सिंघम अगेन’ ( Singham Again ) बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘सिंघम अगेन’ चित्रपटाने ओपनिंगला ४३.५ कोटींची कमाई केली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी ४२.५, तिसऱ्या दिवशी ३५.७५ तर, चौथ्या दिवशी या सिनेमाने १७.५ कोटी कमावत भारतीय बॉक्स ऑफिसवर १३९.२५ कोटींचा गल्ला जमावला आहे. तर, जगभरात या चित्रपटाने १८६ कोटी कमावले आहेत. त्यामुळे लवकरच हा सिनेमा २०० कोटींचा आकडा पार करण्यात यशस्वी होणार आहे.

दरम्यान, ‘सिंघम अगेन’मध्ये ( Singham Again ) अजय देवगण, रणवीर सिंह, करीना कपूर, दीपिका पादुकोण, टायगर श्रॉफ आणि अर्जुन कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singham again movie box office collection this marathi writer writes story for the movie sva 00