रोहित शेट्टीच्या बहुचर्चित ‘सिंघम अगेन’चा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अजय देवगण आणि करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा रोहित शेट्टीच्या ‘कॉप युनिव्हर्स’चा एक भाग आहे. या सिनेमात रोहित शेट्टीच्या स्टाईलप्रमाणे जबरदस्त अॅक्शन सीन्स, हवेत उंच उडणाऱ्या गाड्या यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आहे. पाच मिनिटांचा हा ट्रेलर प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राईजेस घेऊन येतो. या मल्टिस्टारर सिनेमात दीपिका पदुकोण ‘लेडी सिंघम’च्या भूमिकेत आहे आणि टायगर श्रॉफसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रामायणाची प्रेरणा

‘सिंघम अगेन’चा ट्रेलर रामायणाच्या कथानकावर आधारित आहे. ट्रेलरमध्ये रावणानं सीतेचं अपहरण केल्यासारखं सिनेमातील खलनायक करीना कपूरचं अपहरण करतो. अजय देवगण करीना कपूरला वाचविण्यासाठी श्रीलंकेला जातो, असं ट्रेलरमध्ये दिसतं. सिनेमात मुख्य खलनायकांच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर आहेत. अर्जुन कपूरला खलनायकाच्या भूमिकेत पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसतो.

हेही वाचा…करण जोहरवर ‘जिगरा’ सिनेमामुळे झाला घराणेशाहीचा आरोप, इन्स्टाग्रामवर मोठी पोस्ट लिहित म्हणाला, “मी हात जोडतो…. “

सिंगम अगेनच्या ट्रेलरमधील काही क्षण (Photo Credit : Singham Again Trailer Screen Shot)

लेडी सिंघम आणि टायगर श्रॉफची नवी एन्ट्री

ट्रेलर जसजसा पुढे जातो, तशी एकेक पात्रं समोर येतात. ‘लेडी सिंघम’ शक्ती शेट्टी या भूमिकेत दीपिका पदुकोण रावडी लूकमध्ये डायलॉग बोलताना दिसणार आहे. टायगर श्रॉफसुद्धा अनेक स्टंट्स करीत अजय देवगणला त्याच्या मिशनमध्ये मदत करीत आहे. ‘सिंघम अगेन’ मधून दीपिका आणि टायगरची रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये एन्ट्री झाली आहे.

सिंबा आणि लेडी सिंघमची जोडी

रणवीर सिंगनं साकारलेलं ‘सिंबा’ हे पात्रदेखील ‘सिंघम’मध्ये असणार आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहेत. रणवीरच्या ‘सिंबा’ या पात्रातून प्रेक्षकांना कॉमेडी आणि अॅक्शनचा डोस मिळणार असल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होतं.

हेही वाचा…करण जोहरच्या प्रकृतीबद्दल चाहत्यांनी व्यक्त केली चिंता; व्हायरल फोटो पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का, म्हणाले…

सिंगम अगेन सिनेमाच्या ट्रेलरमधील कारचा स्टंट Photo Credit : (Singham Again Trailer Screen Shot)

अक्षय कुमारची ग्रॅण्ड एन्ट्री

सिनेमात अक्षय कुमारची हेलिकॉप्टरमधून ग्रॅण्ड एन्ट्री होत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसतं. रोहित शेट्टीनं सिनेमात हेलिकॉप्टरच्या वरून गाडी उडवून प्रेक्षकांसाठी धमाल दिवाळीची तयारी केली आहे, असं दिसतंय.

मल्टिस्टारर असलेला हा सिनेमा १ नोव्हेंबर २०२४ ला प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singham again trailer released ajay devgn kareena kapoor khan deepika padukone stunning action and stunts in rohit shetty cop universe psg