Singham Again Trailer: रोहित शेट्टीचा ‘सिंघम अगेन’ हा सिनेमा यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे . या सिनेमात अजय देवगण पुन्हा बाजीराव सिंघमच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात रामायणाचा संदर्भ आहे , ज्यात करीना कपूर खान, टायगर श्रॉफ, रणवीर सिंग, अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अक्षय कुमार सुद्धा सिनेमात असून दीपिका पदुकोण या चित्रपटात शक्ती शेट्टी या महिला पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा रोहित शेट्टीच्या कोप युनिव्हर्सचा एक भाग आहे.

दीपिकाचा हा चित्रपट तिच्या आणि रणवीरच्या मुलीच्या जन्मानंतरचा पहिला चित्रपट आहे. चित्रपट निर्मात्यांनी सोमवारी ‘सिंघम अगेन’चा ट्रेलर प्रदर्शित केला, ज्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या तीन तासांत २ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हिंदी सिनेमातील सर्वात लांब ट्रेलरपैकी हा एक आहे, ड्रामा, भावना आणि अ‍ॅक्शनने भरलेला आहे. हा जवळपास ५ मिनिटांचा ट्रेलर आहे, ज्यात प्रत्येक पात्राचं भव्य आणि आकर्षक सादरीकरण आहे, त्यामुळे प्रेक्षकांची चित्रपटाकडील अपेक्षा वाढली आहे. हा चित्रपट १ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”

हेही वाचा…Singham Again : रामायणाशी खास कनेक्शन ते खलनायकाचा जबरदस्त अंदाज! ५ मिनिटांचा ट्रेलर पाहिलात का?

५ मिनिटाचा ट्रेलर कापायला लागले ४० दिवस

एका सूत्राच्या हवाल्याने ‘इटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार , या ट्रेलरची एडिटिंग करण्यासाठी रोहितला खूप वेळ लागला. या सूत्राने सांगितले, “रोहित सर आणि त्यांच्या टीमने जवळपास ३५ ते ४० दिवस या ट्रेलरला योग्यरित्या सादर करण्यासाठी मेहनत घेतली. ट्रेलर तयार करण्यासाठी एवढा वेळ घेण्याची ही त्यांची पहिलीच वेळ असावी.”

काय आहे ट्रेलरमध्ये ?

‘सिंघम अगेन’च्या ट्रेलरमध्ये रावण जस सीतेचं अपहरण करतो तस सिनेमातील खलनायक करीना कपूरचं अपहरण करतो. अजय देवगण करीना कपूरला वाचविण्यासाठी श्रीलंकेला जातो, असं ट्रेलरमध्ये दिसतं. त्याच्या या मिशनमध्ये दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, अक्षय कुमार आणि रणवीर सिंह त्याला मदत करतात. यादरम्यान हेलिकॉप्टरच्या वरून उडणाऱ्या गाड्या, अनेक स्टंट्स आणि जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळते.

हेही वाचा…Video : “आमची बेबी सिम्बाही करणार चित्रपटात पदार्पण”, ‘सिंघम अगेन’च्या ट्रेलर लाँचप्रसंगी रणवीर सिंहचं लेकीबद्दल वक्तव्य

‘सिंघम अगेन’चा सामना ‘भूल भुलैया ३’ बरोबर होणार आहे, ज्यात कार्तिक आर्यन, त्रिप्ती डिमरी, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित-नेने यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Story img Loader