Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3 : २०२४मधील बहुप्रतीक्षित चित्रपट ‘भूल भुलैया ३’ आणि ‘सिंघम अगेन’ यांचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ सुरू आहे. दिवाळीचं औचित्य साधून प्रदर्शित झालेल्या या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. रुह बाबा आणि बाजीराव सिंघम यांच्यात बॉक्स ऑफिसवर चढाओढ पाहायला मिळत आहे. सुरुवातीला ‘सिंघम अगेन’ आघाडीवर होता. पण आता ‘भूल भुलैया ३’च्या रुह बाबामुळे ‘सिंघम अगेन’ पिछाडीवर आहे.

१ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या ‘भूल भुलैया ३’ आणि ‘सिंघम अगेन’ या दोन्ही चित्रपटांमध्ये काटे की टक्कर सुरू आहे. दोन्ही चित्रपट तगडी कमाई करत आहेत. पण तिसऱ्या शनिवारी ‘भूल भुलैया ३’ ‘सिंघम अगेन’वर वरचढ झाल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा – लोकप्रिय मालिकेच्या सेटवर मोठा अपघात; विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू

रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटाने पहिल्या आठवड्यात १७३ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या आठवड्यात ४७.७ कोटींचा व्यवसाय केला. त्यानंतर तिसऱ्या आठवड्यात एन्ट्री घेतल्यानंतर ‘सिंघम अगेन’ चित्रपटाने शुक्रवारी ३.७५ कोटींचा गल्ला जमवला. हळूहळू कमाईचा आकडा हा घसरताना दिसत आहे. तिसऱ्या शनिवारी ‘सिंघम अगेन’ चित्रपटाने ३.२५ कोटींची कमाई केली असून आतापर्यंत या चित्रपटाने एकूण २२६.५ कोटी कमावले आहेत.

हेही वाचा – Video: ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’मधील तेजसने सोलापुरी भाषेत मानसीला केलं प्रपोज, म्हणाला, “बार्शी तिथं सरशी…”

अनीस बज्मी दिग्दर्शित ‘भुल भूलैया ३’ चित्रपटाने पहिल्या आठवड्यात १५८.२५ कोटींचा व्यवसाय केला होता. दुसऱ्या आठवड्यात ५८ कोटी कमावले. तिसऱ्या शुक्रवारी कार्तिक आर्यनच्या या चित्रपटाने ४.१५ कोटींची कमाई केली. त्यानंतर शनिवारी ४.७५ कोटींचा गल्ला जमवला. ‘भूल भुलैया ३’ चित्रपटाने आतापर्यंत एकूण २२५ कोटी कमावले आहेत. शनिवारच्या कमाईत ‘भूल भुलैया ३’ ‘सिंघम अगेन’वर वरचढ झाला असला तरी एकूण कमाईत थोड्या फार फरकाने मागे आहे.

हेही वाचा – “लग्नसंस्था आता आपण समाजानेचं मोडीत काढल्यात…”, घटस्फोटाबाबत बोलताना विशाखा सुभेदारचं वक्तव्य, म्हणाली…

दरम्यान, ‘भूल भुलैया ३’ आणि ‘सिंघम अगेन’नंतर आता ‘कंगुवा’, ‘द साबरमती रिपोर्ट’ हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. तरीही ‘भूल भुलैया ३’ आणि ‘सिंघम अगेन’ या दोन्ही चित्रपटांची जादू बॉक्स ऑफिसवर कायम आहे.