Ratan Tata Passed Away: दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. दानशूर व दयाळू रतन टाटा यांच्या निधनाने देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बॉलीवूड सेलिब्रिटीही पोस्ट करून रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रतन टाटा यांच्या विचारांनी प्रभावित झालेले भारतात अनेक लोक आहेत. या दिग्गज रतन टाटा यांची भूमिका करण्याची संधी आजपर्यंत फक्त एकमेव बॉलीवूड अभिनेत्याला मिळाली. या अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट करून त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हा अभिनेता कोण व कोणत्या चित्रपटात त्याने रतन टाटा यांची भूमिका केली होती, ते जाणून घेऊयात.

हेही वाचा – रतन टाटा यांच्या निधनानंतर सिमी गरेवाल यांची भावनिक पोस्ट; म्हणाल्या, “तुमचं जाणं सहन करणं…”

बॉलीवूड अभिनेते बोमन इराणी यांना एकमेव आहेत, ज्यांना पडद्यावर रतन टाटा यांची भूमिका साकारायला मिळाली. त्यांनी विवेक ओबेरॉयची मुख्य भूमिका असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये रतन टाटा यांची भूमिका केली होती. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ओमंग कुमारने केलं होतं. २४ मे २०१९ रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.

हेही वाचा – कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची रतन टाटांशी भेट अन् मैत्री कशी झाली? वाचा

बोमन इराणींची पोस्ट

“आपल्या देशासाठी योगदान, उद्योगातील योगदान, परोपकारी, माणुसकी आणि प्राण्यांसाठी असलेली माया; रतन टाटा हे आधुनिक भारतातील सर्वात चांगल्या लोकांपैकी एक म्हणून कायम स्मरणात राहतील,” अशी भावनिक पोस्ट बोमन इराणी यांनी केली आहे.

रतन टाटा यांचे बुधवारी रात्री ९ ऑक्टोबर रोजी निधन झाले. प्रकृती बिघडल्याने त्यांना सोमवारी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते आयसीयूमध्ये होते. बुधवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले.