गेले काही दिवस सोशल मीडियावर एकाच चित्रपटाची चर्चा आहे तो चित्रपट म्हणजे ‘आदिपुरुष’. चित्रपटातील vfx वरुन सध्या वाद सुरु आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांनी ‘आदिपुरुष’बद्दल विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काहींनी तर टीझर पाहून चित्रपटामधील कलाकारांच्या लूकची खिल्ली उडवली. चित्रपटाच्या व्हीएफएक्सबाबतही नेटकरी टीका करत आहेत. या चित्रपटाच्याबाबतीत मुकेश खन्नापासून ते नितीश भारद्वाजसारखे अभिनेते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. जुन्या रामायण मालिकेतील सीतेचे पात्र साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
दीपिका चिखलिया आज तकशी बोलताना म्हणाल्या, चित्रपटातील पात्रांनी प्रेक्षकांना आकर्षित केले पाहिजे. ‘जर पात्र श्रीलंकेचे असेल तर ते मुघलांसारखे दिसू नये. टिझरमध्ये तीस सेकंद फक्त मी त्याला बघितले आहे त्यामुळे मला जास्त समजू शकले नाही, परंतु तो वेगळा दिसत आहे. मी मान्य करते की काळ बदलला आहे, VFX हा एक आवश्यक भाग आहे पण जोपर्यंत लोकांच्या भावना दुखावल्या जात नाहीत तोपर्यंतच, हा चित्रपटाचा केवळ टीझर आहे त्यामुळे हा चित्रपटाला न्याय देऊ शकत नाही’.
Review : दिल्लीच्या तख्ताला मराठी मुलुखाचा स्वाभिमान समजायला लावणारा ‘शिवप्रताप गरुडझेप’
दीपिका चिखलिया पुढे म्हणाल्या, ‘जर मी अरविंद त्रिवेदी (रामानंद सागरच्या रामायणमधील रावण) यांच्याशी स्वतःला जोडण्याचा प्रयत्न केला तर मला बरे वाटणार नाही. पण माझा असाही विश्वास आहे की प्रत्येक अभिनेत्याला व्यक्तिरेखा साकारण्याचे स्वातंत्र्य आहे’. रामायण आणि महाभारत या दोन मालिका ८० आणि ९०च्या दशकात अतिशय लोकप्रिय होत्या. दीपिका चिखलिया सीतेची भूमिका यांनी साकारलेली सीतेची भूमिका लोकप्रिय ठरली होती.
दरम्यान आदिपुरुष हा चित्रपट येत्या १२ जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट विविध ५ भाषांमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटाची कथा रामायणावर आधारित आहे. याचे बजेट ५०० कोटी असल्याचे बोललं जात आहे. याचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून अनेकांनी यावर चांगल्या वाईट प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच अनेकांनी हा चित्रपट बॉयकॉट करा अशी मागणीही केली आहे.