Sky Force Box Office Collection Day 1: अक्षय कुमार व वीर पहारियाचा चित्रपट ‘स्काय फोर्स’ चित्रपट २४ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. ‘स्काय फोर्स’ हा देशभक्तीपर चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळाले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली. अक्षय कुमारच्या आधीच्या अनेक चित्रपटांपेक्षा या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई खूप जास्त आहे. तसेच हा २०२५ मधील सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अक्षय कुमार अखेरचा ऑगस्ट २०२४ मध्ये आलेल्या ‘खेल खेल में’ या चित्रपटात झळकला होता. हा चित्रपटही फ्लॉप झाला होता. त्यानंतर आता अक्षयने ‘स्काय फोर्स’मधून दमदार कमबॅक केले आहे, असं म्हणता येईल. या चित्रपटातून वीर पहारियाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. वीर हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. ‘स्काय फोर्स’ १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर भारताने केलेल्या प्रत्युत्तराच्या हल्ल्याची कथा आहे.

स्काय फोर्सची कमाई किती?

‘स्काय फोर्स’चे देशभरात सुमारे ४९०० शो दाखवण्यात आले. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ११.२५ कोटी रुपयांची कमाई केली. कंगना राणौतचा ‘इमर्जन्सी’ आणि अजय देवगणचा ‘आझाद’ या चित्रपटाच्या एका आठवड्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पण त्याचे ओपनिंग डे कलेक्शन या दोन्ही चित्रपटांपेक्षा चांगले होते. देशभक्तीवर आधारित या चित्रपटालाही २६ जानेवारीला मोठा फायदा होईल असं दिसत आहे. अक्षय कुमारबरोबरच या चित्रपटातील वीर पहारियाच्या कामाचं खूप कौतुक होत आहे. या सिनेमात सारा अली खानही आहे.

‘स्काय फोर्स’चे बजेट किती?

Sky Force Budget: ‘स्काय फोर्स’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्मात्यांनी मोठा खर्च केला आहे. या चित्रपटाचे बजेट तब्बल १६० कोटी रुपये आहे. येत्या काही दिवसांत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कलेक्शन करतो ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

अक्षयच्या मागील काही चित्रपटांची ओपनिंग

सूर्यवंशी: २६.२९ कोटी
बड़े मियां छोटे मियां: १६.०७ कोटी
राम सेतु: १५.२५ करोड़
बच्चन पांडे: १३.२५ कोटी
सम्राट पृथ्वीराज: १०.७० कोटी
OMG 2: १०.२६ कोटी
रक्षाबंधन: ८.२० कोटी
खेल-खेल में: ५.२३ कोटी
मिशन रानीगंज : २.८० कोटी
बेल बॉटम: २.७५ कोटी
सरफिरा: २.५० कोटी
सेल्फी: २.५५ कोटी