Sky Force Box Office Collection Day 4 : वीर पहारिया व अक्षय कुमार ‘स्काय फोर्स’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. शुक्रवारी (२४ जानेवारीला) प्रदर्शित झालेल्या या देशभक्तीपर चित्रपटाने वीकेंडला जबरदस्त कमाई केली. पण चौथ्या दिवशी म्हणजेच रिलीजनंतरच्या पहिल्या सोमवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी घट झाली आहे. या चित्रपटाची चार दिवसांची कमाई किती? ते जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहारियाने ‘स्काय फोर्स’ मधून बॉलीवूड पदार्पण केलं आहे. वीर हा शिंदे यांच्या कन्या स्मृती पहारिया व संजय पहारिया यांचा मुलगा आहे. वीर जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहारियाचा भाऊ आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी राजकारणाची असलेल्या वीरने सिनेविश्वात पाऊल ठेवलं आहे. विशेष म्हणजे त्याच्या पदार्पणाच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘स्काय फोर्स’ची ४ दिवसांची कमाई

‘स्काय फोर्स’ची बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात झाली. चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी १५.३० कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली. चित्रपटाने शनिवारी २६.३० कोटी रुपयांचे कलेक्शन केले. तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी २६ जानेवारीला सुट्टीच्या दिवशी हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली. आधीच्या दोन्ही दिवसांपेक्षा तिसऱ्या दिवशी कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली. रविवारी ३१.६० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. ३ दिवसांत चित्रपटाने भारतात ८६.४० व जगभरात ९२.९० कोटी रुपये कमावले. आता चौथ्या दिवसाची आकडेवारी समोर आली आहे. चौथ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत घसरण झाली आहे. प्रारंभिक आकडेवारीनुसार, चित्रपटाने पहिल्या सोमवारी ६.२५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले.

‘स्काय फोर्स’च्या बजेटच्या तुलनेत चित्रपटाने निम्म्याहून जास्त कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट या आठवड्यात निर्मितीखर्च वसूल करेल, असं दिसत आहे. ‘स्काय फोर्स’चे बजेट तब्बल १६० कोटी रुपये आहे. ‘स्काय फोर्स’ची चार दिवसांची कमाई जवळपास ९९ कोटी रुपये झाली आहे. लवकरच हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा पार करेल.

‘स्काय फोर्स’ अक्षय कुमार व वीर पहारिया यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच सारा अली खान, निम्रत कौर, बोगुमिला बुबैकदेखील या चित्रपटात आहे.