Prateik Babbar Wedding : दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील व अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा अभिनेता प्रतीक बब्बर लग्नबंधनात अडकला आहे. आज, १४ फेब्रुवारीला प्रतीकने गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. प्रतीक बब्बर व प्रिया बॅनर्जीच्या लग्नाचे फोटो आता समोर आले आहेत. मोठ्या थाटामाटात दोघांनी लग्न केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रतीकची दुसरी पत्नी प्रिया बॅनर्जीने सोशल मीडियावर नुकतेच लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. “मी प्रत्येक जन्मात तुझ्याशीच लग्न करेन”, असं कॅप्शन लिहित प्रियाने लग्नातील खास क्षण शेअर केले आहेत. लग्नासाठी दोघांनी खास ऑफ व्हाइट रंगाचा पेहराव केला होता. प्रियाने लेहेंगा तर प्रतीकने शेरवानी घातली होती. दोघं या पेहरावात खूपच सुंदर दिसत आहेत.

प्रियाने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये दोघं किस करताना पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये प्रतीक प्रियाला मंगळसूत्र घालताना दिसत आहे. तसंच तिसऱ्या फोटोमध्ये अभिनेता भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी प्रिया त्याला सावरताना दिसत आहे. असे लग्नातील खास क्षणाचे फोटो प्रियाने शेअर केले असून सोशल मीडियावर क्षणार्धात व्हायरल झाले आहेत. तसंच आता प्रतीक बब्बर आणि प्रिया बॅनर्जीला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रिया बॅनर्जी कोण आहे?

प्रतीक बब्बरची दुसरी पत्नी प्रिया ही दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. दाक्षिणात्य सिनेमातून तिने करिअरला सुरुवात केली होती. याशिवाय प्रिया ऐश्वर्या राय-बच्चनच्या ‘जज्बा’ चित्रपटात झळकली होती. तसंच तिने ‘बेकाबू’, ‘राणा नायडू’ आणि ‘हॅलो मिनी’ यांसारख्या सीरिजमध्ये काम केलं आहे.

प्रतीक बब्बरची पहिली पत्नी कोण होती?

दरम्यान, प्रतीक बब्बरचं पहिलं लग्न चित्रपट निर्माती सान्या सागरशी झालं होतं. अनेक वर्ष डेट केल्यानंतर २०१९मध्ये प्रतीक व सान्याने लग्न केलं होतं. पण वर्षभरातच दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. जानेवारी २०२३मध्ये प्रतीक व सान्याचा अधिकृतरित्या घटस्फोट झाला. त्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रतीकने प्रिया बॅनर्जीशी साखरपुडा केला.