८० दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या अभिनयाने बॉलिवूड गाजवलं होतं. एका मराठी कुटुंबातून आलेल्या स्मिता यांना त्यावेळी ‘डस्की ब्यूटी’ म्हणून ओळखलं जायचं. यांच्यावर राज बब्बर भलतेच फिदा होते. त्याच्या या प्रेम कहाणीची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती. पण त्याचा अंत मात्र खूपच दुःखद झाला होता. स्मिता पाटील यांनी वयाच्या ३१ व्या वर्षीच या जगाला अलविदा केलं आणि दोघांची प्रेमकहाणी इथेच संपली. मात्र या दरम्यानच्या काळात दोघांच्या आयुष्यात बरेच चढ- उतार आले. त्यांना बराच संघर्ष करावा लागला.

आपल्या चित्रपट कारकिर्दीपेक्षा खासगी आयुष्य आणि वैवाहिक जीवनातील चढ- उतार यामुळे राज बब्बर जास्त चर्चेत राहिले. करिअरच्या अगदी सुरुवातीच्या काळात ते नादिरा जहीर यांच्या प्रेमात पडले होते. दोघंही नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये शिक्षण घेत होते. १९७५ मध्ये त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर दोघंही दिल्लीमध्येच राहत होते. नंतर त्यांची मुलगी जूहीच्या जन्म झाला आणि राज बब्बर यांच्या जबाबदाऱ्या वाढल्या. त्यावेळी त्यांना अशा कामाची गरज होती जे त्यांना चांगला पैसा देऊ शकेल. त्यांनी आपलं अभिनय करिअर पुढे नेण्याचा विचार केला आणि मुंबईला आले. मात्र मुंबईत आल्यावर त्याची करिअरच्या चांगला वेग घेतला पण त्यासोबतचं खासगी आयुष्यात मोठा ट्वीस्ट आला.

Former MP Rajan Vikhare criticizes Chief Minister Eknath Shinde
लाज असेल तर माफी मागा, माजी खासदार राजन विचारे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
jayant patil secret explosion on bhagyashree atrams entry in sharad pawar ncp
गडचिरोली : “राष्ट्रवादीतील फुटीनंतर भाग्यश्री आत्राम शरद पवारांच्या संपर्कात,”जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट
Yuvraj Singh on Father Yograj Singh Says My Father Has Mental Issues Old Video Goes Viral
Yuvraj Singh: “माझ्या वडिलांचं मानसिक आरोग्य…”, योगराज सिंगांच्या धोनी-कपिल देव यांच्यावरील वक्तव्यानंतर युवराजचा ‘तो’ व्हीडिओ व्हायरल
Yuvraj Singh Father Yograj Singh Statement on MS Dhoni
Yograj Singh: “धोनीमुळे युवराजने लवकर निवृत्ती घेतली…”, वडिल योगराज सिंग यांचा गौप्यस्फोट
when raj kapoor met nargis dutt at rishi kapoor wedding
“माझे पती देखणे अन् रोमँटिक आहेत, त्यामुळे…”; नर्गिस यांना स्पष्टच बोलल्या होत्या राज कपूर यांच्या पत्नी
Sharmila Thackeray on Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse
Sharmila Thackeray : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शर्मिला ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या, “कोकणातील लोक कोणत्या रक्ताचे…”
Escaping with a girl met on Facebook Nagpur crime news
प्रेमविवाहानंतरही पतीचे विवाहित महिलेसोबत पलायन

मुंबईत आलेल्या राज बब्बर यांची ओळख मराठमोळी अभिनेत्री स्मिता पाटीलशी झाली. १९८२ मध्ये दोघांची पहिली भेट ‘भीगी पलकें’ चित्रपटाच्या सेटवर झाली. दोघंही या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. पण त्यांची पहिली भेट काही खास नव्हती. एका मुलाखतीत राज बब्बर यांनी सांगितलं होतं, “आम्ही त्यावेळी ओडिशाच्या राउरकेलामध्ये शूटिंग करत होतो. शूटिंगच्या वेळीच माझी आणि स्मिताची पहिली भेट झाली. या भेटीत सुरुवातीला आम्ही थोडी मजा- मस्ती केली. पण नंतर आमच्यात वादही झाले. ती रागात मला काही बोलली होती पण मला तिचे ते शब्द खूप भावले होते. मी तिच्या या रागावर त्याच क्षणी फिदा झालो होतो.”

आणखी वाचा- “मी आयुष्याची वाट लावून घेतली होती त्याला आई जबाबदार…” प्रतीक बब्बरचा धक्कादायक खुलासा

अर्थात राज बब्बर आणि स्मिता पाटील यांच्या अफेअरच्या चर्चांनी त्यांची पत्नी नादिराला मोठा धक्का बसला होता. २०१३ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत नादिरा म्हणाल्या होत्या, “जेव्हा मी राज यांच्या तोंडूनच त्यांची प्रेमकहाणी ऐकली तेव्हा मी हैराण झाले होते. पण नंतर मी स्वतःला सांभाळलं कारण माझी दोन मुलं होती. जर आई स्वतःला सांभाळू शकली नाही तर मुलांचं काय होईल या विचाराने मी स्वतःला खंबीर बनवलं. मी स्वतःला कामात व्यग्र ठेवलं.” स्मितासोबत नातं जोडल्यानंतर राज बब्बर यांनी नादिराला मात्र एकटं सोडलं नाही. पण त्यांनी स्मिताला पूर्ण साथ दिली.

राज आणि नादिरा यानंतर वेगळे झाले आणि स्मिता यांनीही राज यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण हे त्यांच्यासाठी अजिबात सोपं नव्हतं कारण राज अगोदरच विवाहित होते आणि त्यांना दोन मुलं देखील होती. त्यामुळे स्मिता यांच्या आई- वडिलांनी या लग्नाला नकार दिला. विवाहित पुरुषाशी आपल्या मुलीने लग्न करणं त्यांच्या पालकांना अजिबात मान्य नव्हतं. पण स्मिता काही शांत राहणाऱ्यांतल्या नव्हत्या. त्यांन कुटुंबियांच्या विरोधात जाऊन राज यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या चित्रपटातील भूमिका स्वतः निर्णय घेणाऱ्या स्मिता यांनी स्वतःच्या आयुष्याचा निर्णय देखील स्वतःच घेतला.

आणखी वाचा- “हिरोला नग्न दाखवू शकत नाही पण स्त्रीला नग्न दाखवले तर…”; स्मिता पाटील यांचं ‘ते’ बोल्ड विधान पुन्हा चर्चेत

लग्नानंतर स्मिता गरोदर राहिल्या आणि त्यांनी १३ डिसेंबर १९८६ रोजी मुलाला जन्म दिला. आज त्यांचा मुलगा प्रतीक बब्बर बॉलिवूडच्या नावाजलेल्या अभिनेत्यांमध्ये गणला जातो. पण प्रतीकच्या जन्माच्या वेळी स्मिता यांना खूप त्रास झाला. डिलिव्हरीच्या वेळी त्यांची तब्येत खूपच बिघडली. मुलाला जन्म दिल्यानंतर अवघ्या १५ दिवसांतच स्मिता यांनी वयच्या ३१ व्या वर्षीच या जगाचा निरोप घेतला. यासोबतच राज बब्बर आणि स्मिता पाटील यांच्या प्रेमकहाणीचा देखील शेवट झाला.