बॉलीवूड अभिनेता प्रतीक बब्बर सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. प्रतीकने त्याची गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी दुसरं लग्न केलं. दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डेला प्रिया व प्रतीक यांनी इन्स्टाग्रामवर नातं अधिकृत केलं होतं. त्यानंतर आता शुक्रवारी (१४ फेब्रुवारी २०२५) त्यांनी मुंबईत लग्न केलं. या लग्न सोहळ्यातील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

प्रतीक व प्रियाच्या लग्नाला मोजकेच लोक उपस्थित होते. प्रिया बॅनर्जीचे कुटुंबीय या लग्नाला हजर होते व दोघांचे काही जवळचे मित्र या लग्नात उपस्थित राहिले. पण प्रतीकने त्याच्या कुटुंबाला लग्नाचं निमंत्रण दिलं नव्हतं. वडील राज बब्बर यांनाही त्याने लग्नाला बोलावलं नव्हतं. तसेच त्याची सावत्र भावंड आर्य बब्बर, जुही बब्बर व सावत्र आई नादिरा यांनाही त्याने लग्नाचं निमंत्रण दिलं नाही. प्रतीकच्या दुसऱ्या लग्नाबद्दल बातम्यांमधून समजलं, असं आर्य बब्बरने म्हटलंय. अशातच प्रतीकच्या लग्नातील एका व्हिडीओने लक्ष वेधून घेतले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत प्रतीक त्याच्या लग्नात हमसून हमसून रडताना दिसत आहे. त्याची पत्नी प्रिया रडत होती, नंतर प्रतीकही लग्नात खूप रडू लागला. त्याला रडताना पाहून प्रियाने त्याला अश्रू पुसण्यासाठी टिश्यू पेपर दिला.

पाहा व्हिडीओ –

प्रतीक व प्रियाचा हा व्हिडीओ पाहून चाहते विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. ‘त्याला स्मिता पाटील यांची आठवण येत असेल’, ‘प्रतीकला आईची आठवण येतेय,’ ‘प्रियाला कधीच सोडू नकोस,’ अशा कमेंट्स या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत.

prateik babbar wedding video 2
प्रतीकच्या व्हिडीओवरील कमेंट्स (सौजन्य – स्क्रीनशॉट)
prateik babbar wedding video 1
प्रतीकच्या व्हिडीओवरील कमेंट्स (सौजन्य – स्क्रीनशॉट)

दरम्यान, प्रतीकच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास त्याचं हे दुसरं लग्न आहे. त्याचं पहिलं लग्न २०१९ मध्ये सान्या सागरशी झालं होतं, पण २०२३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर प्रिया प्रतीकच्या आयुष्यात आली. प्रिया व प्रतीक यांनी काही काळ एकमेकांना डेट केलं, मग ते लिव्ह इनमध्ये राहू लागले. आता दोघांनीही लग्न करून आयुष्यातील नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे.

प्रतीकच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्याच्या लग्नाच्याच दिवशी त्याचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ‘धूम धाम’ या चित्रपटात त्याने महत्त्वाची भूमिका केली आहे. या चित्रपटात प्रतीकबरोबरच यामी गौतम व प्रतीक गांधी, एजाज खान यांनीदेखील काम केलं आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.

Story img Loader