बॉलीवूड अभिनेता प्रतीक बब्बरला ड्रग्जचं व्यसन होतं. खूप कमी वयातच त्याला हे व्यसन जडलं होतं. या व्यसनातून कालांतराने तो बाहेर पडला. प्रतीक अनेकदा त्याच्या या व्यसनाबद्दल जाहीरपणे बोलत असतो. प्रतीक हा दिवंगत दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील व अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा आहे. प्रतीकने २०१३ मध्ये ड्रग्जच्या व्यसनातून मुक्त झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिग्दर्शक अब्बास टायरवाला यांच्या ‘जाने तू… या जाने ना’ (२००८) सिनेमात मुख्य भूमिका करून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रतीकला इंडस्ट्रीत १६ वर्षे झाली आहेत. मात्र इंडस्ट्रीत येण्याआधीपासूनच ड्रग्जचं व्यसन होतं, असं प्रतीकने सांगितलं. या व्यसनाचा वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर परिणाम झाला, असं प्रतीक म्हणाला.

हेही वाचा – १४ वर्षांचा संसार मोडण्याचं कारण काय? पहिल्यांदाच बोलली ‘खल्लास गर्ल’; म्हणाली, “त्याने अत्यंत बेजबाबदारपणे…”

“लोकांना वाटतं की ‘अरे, हा फिल्म इंडस्ट्रीत आला, त्याला प्रसिद्धी आणि पैसा मिळाला आणि मग त्याने ड्रग्ज घेण्यास सुरुवात केली.’ पण तसं नाही. माझ्याबाबतीत हे खरं नाही. मी १२-१३ वर्षांचा होतो, तेव्हपासून मी ड्रग्ज घेत होतो. मात्र, त्याचं कारण चित्रपटसृष्टी नाही. दुर्दैवाने, माझं संगोपन वेगळ्या पद्धतीने झालं आणि माझी कौटुंबिक परिस्थिती थोडी कॉम्प्लिकेटेड होती. त्यामुळे मी ड्रग्ज घ्यायला लागलो. इंडस्ट्रीतील प्रसिद्धी आणि पैसा यामुळे मला ते व्यसन जडलं नव्हतं,” असं प्रतीक बॉलीवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

हेही वाचा – घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध

प्रतीक म्हणाला, “हो, ड्रग्जचा माझ्यावर परिणाम झाला आणि अजूनही होतो. खासकरून नात्यांवर परिणाम होतो. ड्रग्जचा संबंध आघाताशी (ट्रॉमा) आहे. जोपर्यंत तुम्ही ट्रॉमातून बाहेर पडत नाही तोपर्यंत त्याचा परिणाम नात्यांवर आणि आयुष्यातील इतर गोष्टींवर होत राहील. पण आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा तुम्हाला गोष्टी चांगल्या करण्यासाठी काम करावं लागतं. मीही अनेक वर्षांपासून ते करतोय. माझी होणारी पत्नी प्रिया बॅनर्जी मला सुधारण्यासाठी खूप मदत करत आहे. तिला काहीच बदलण्याची गरज नाही, ती परफेक्ट आहे; मात्र आम्ही एकमेकांना आयुष्यात पुढे जाण्यास मदत करतोय. आयुष्य हे असंच आहे आणि पुढे जावंच लागतं.”

हेही वाचा – ९ वर्षांचा संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्यापासून घटस्फोट घेतल्यावर गायिकेने मुंबईत घेतलं घर, फोटो केले शेअर

प्रतीकचं पहिलं लग्न चित्रपट निर्माती सान्या सागरशी झालं होतं. २०१९ मध्ये त्यांनी लग्न केलं आणि वर्षभरात ते वेगळे राहू लागले. नंतर २०२३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. या वर्षाच्या सुरुवातीला प्रतीकने अभिनेत्री, मॉडेल प्रिया बॅनर्जीशी साखरपुडा केला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smita patil son prateik babbar reacts on his drugs addiction says my family situation was complicated hrc