रोनित रॉय हे प्रसिद्ध अभिनेते आहेत. ‘क्योंकी सास भी कभी बहु थी’, ‘अदालत’, ‘इतना करो ना मुझे प्यार’ अशा मालिकांमधून रोनित रॉय यांनी प्रसिद्धी मळिवली. छोटा पडदा गाजवणाऱ्या रोनित यांनी चित्रपटांतही काम केलं. ‘जान तेरे नाम’, ‘शेहजादा’ अशा चित्रपटांतून त्यांनी मोठ्या पडद्यावर छाप पाडली.
रोनित रॉय यांचा चाहता वर्ग मोठा असून ते सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच रोनित रॉय यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. “भाई, ब्रो…हे शब्द त्यांचं महत्त्व गमावून बसले आहेत. जेव्हा कोणी या शब्दांनी मला हाक मारतं, तेव्हा मी ते नातं गांभीर्याने घेतो. पण शत्रूबरोबरही कोणी वागू नये, असं ते माझ्याबरोबर वागतात. यामुळे खूप वेदना होतात…पण चलता है…,” असं रोनित यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.
हेही वाचा>> वनिता खरातला बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाबरोर करायचं आहे काम, म्हणाली, “त्याचे चित्रपट…”
रोनित यांनी शेअर केलेली ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही रोनित यांच्या पोस्टनर कमेंट करत “काय झालं?” असं विचारलं आहे. रोनित यांच्या पोस्टवरील स्मृती इराणींच्या कमेंटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हेही वाचा>> “चित्रपट तसा बरा हाय, पण…”, नागराज मंजुळेंच्या ‘घर बंदुक बिरयानी’बाबत किरण मानेंची पोस्ट, म्हणाले…
दरम्यान, रोनित रॉय व स्मृती इराणी यांनी ‘क्योंकी की सास भी कभी बहु थी’ मालिकेत एकत्र स्क्रीन शेअर केली होती. या मालिकेत स्मृती इराणी यांनी तुलसी तर रोनित यांनी त्यांच्या पती मिहीरची भूमिका साकारली होती. त्यांची ऑन स्क्रीन जोडी प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली होती.