केंद्रीय मंत्री स्मृती इराणी एकेकाळी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या. त्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांनी नुकतीच एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी स्मृती यांची भेट जॅकी श्रॉफ आणि जेडी मजेठिया या अभिनेत्यांशी झाली. त्यांच्याबरोबरचे खास फोटो स्मृती इराणी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या दोन्ही फोटोंना त्यांनी मजेशीर कॅप्शन दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्मृती इराणींनी शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेते जॅकी श्रॉफ आणि स्मृती इराणी एकमेकांशी गांभीर्याने संवाद साधत असल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय त्यांनी शेअर केलेला दुसरा फोटो जेडी मजेठिया यांच्याबरोबरचा आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी या दोन्ही फोटोंना मजेशीर कॅप्शन दिलं आहे. स्मृती इराणी लिहितात, “डाएट करण्याचा सल्ला देण्याचे दोन प्रकार…प्रचंड मेहनत करा पण, काहीच चमत्कार नाही.” यातील पहिल्या फोटोच्या (जॅकी श्रॉफ) कॅप्शमध्ये त्या लिहितात, “भिडू वजन कमी कर…फिट राहा फॅट नको होऊस. अंडी खा…वांगी खा पण, ब्रेड नको खाऊस.”

हेही वाचा : Video : अंशुमन विचारेने खरेदी केलं नवीन घर! व्हिडीओ शेअर करत दाखवली पहिली झलक; म्हणाला, “लवकरच…”

जेडी मजेठिया यांच्याबरोबरच्या दुसऱ्या फोटोला कॅप्शन देत स्मृती इराणी लिहितात, “ताई, वजन कमी कर…डाएट कर कोणालाही समजणार नाही.” स्मृती इराणी यांनी या दोन्ही फोटोंना दिलेल्या मजेशीर कॅप्शनने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांनी शेअर केलेल्या या फोटोंवर नेटकऱ्यांच्या असंख्य प्रतिक्रिया आल्या आहेत.

हेही वाचा : “पिवळ्या रंगाची नऊवारी…”, पूजा सावंतने पहिल्यांदाच सांगितले लग्नाचे प्लॅन्स, म्हणाली, “मला मुंबईत…”

स्मृती इराणींच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी “मॅडम, तुमचा सेन्स ऑफ ह्युमर खूपच कमाल आहे”, “तुम्ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहात”, “तुम्ही आता खूपच फिट दिसत आहात आणि तुमचं व्यक्तिमत्त्व खूपच चांगलं आहे.”, अशा कमेंट्स केल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smriti irani shares photo with jackie shroff and jd majethia funny caption grabs attention sva 00