बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्य किसी का भाई किसी की जान चित्रपटामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. सतत मिळणाऱ्या या धमक्यांमुळे मुंबई पोलिसांनी सलमानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. नुकतंच सलमानने रजत शर्माच्या ‘आप की अदालत’ (Aap Ki Adalat) या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्याने सतत मिळणाऱ्या धमक्यांनंतर तो कस जगत आहे? याचा अनुभव शेअर केला आहे.
हेही वाचा- सलमान खान लग्नासाठी तयार? म्हणाला, “आता घरूनही दबाव येतोय आणि…”
सलमान म्हणाला, असुरक्षित असण्यापेक्षा सुरक्षा असणं चांगल. आता मला रस्त्यावर सायकलं चालवणं किंवा कुठे एकटं जाणं शक्य नाही. यापेक्षाही जास्त जेव्हा वाहतूक कोंडी झालेली असते तेव्हा इतकी सुरक्षा असते, वाहनांमुळे लोकांना त्रास होत असतो. लोक माझ्याकडे एक कटाक्ष टाकत असतात. गंभीर धमकी असल्यानेच सुरक्षा देण्यात आली आहे,”
हेही वाचा- जिया खान प्रकरणी निर्दोष मुक्तता होताच सूरज पांचोली सिद्धिविनायकाच्या चरणी; घेतला बाप्पाचा आशीर्वाद
“मी प्रत्येक ठिकाणी पूर्ण सुरक्षेत जात आहे. मला माहिती आहे की, कितीही प्रयत्न केला तरी जे काही व्हायचं ते होणार आहे. मला वाटतं देव आहे. याचा अर्थ मी उघडपणे फिरायचं असा नाही. आता माझ्याभोवती खूप सारे शेरा आहेत. माझ्याभोवती इतक्या बंदुका आहेत की कधीकधी मलाच भीतीच वाटते”. “जे काही मला सांगितलं जात आहे, त्या सर्व गोष्टी मी करत आहे. किसी का भाई, किसी की जान चित्रपटात एक डायलॉग आहे, त्यानुसार तुम्हाला १०० वेळा भाग्यवान असावं लागतं. पण मला फक्त एकदाच भाग्यवान ठरायचं आहे. त्यामुळे मला फार काळजी घ्यावी लागणार आहे,” असेही सलमान म्हणाला.
हेही वाचा- मुंबईतील आयकॉनिक इरॉस थिएटर खरंच पाडलं? वीर दास, विवेक अग्निहोत्री यांनी व्यक्त केली हळहळ
ज्या व्यक्तीने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्याचं नाव ‘रॉकी भाई’ असं होतं. याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता, संबंधित आरोपी राजस्थानातील जोधपूर येथील रहिवाशी असल्याचं निष्पन्न झालं होतं. सतत जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याने सलमान खानने बुलेट प्रूफ गाडी खरेदी केली आहे. ही गाडी दुबईवरून आयात करण्यात आली असून याचं अद्याप भारतात लाँचिंग करण्यात आलं नाही. निसान कंपनीची ही गाडी सर्वात महागड्या गाड्यांपैकी एक आहे.