शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पठाण’च्या पहिल्या ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून वाद सुरू असतानाच आता या चित्रपटातलं दुसरं गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘झुमे जो पठाण’ असं या गाण्याचं नाव असून या गाण्यातही शाहरुख आणि दीपिका यांची हॉट केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. हे गाणं प्रदर्शित होऊन तीन तासही झाले नाहीत त्याआधीच या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले. एकीकडे अनेकजण या गाण्याचं कौतुक करत असतानाच बऱ्याच जणांनी या गाण्याला ट्रोल केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बेशरम रंग’प्रमाणेच ‘झुमे जो पठाण’ हे गाणं हे शाहरुख आणि दीपिकावर चित्रित झालं आहे. हे गाणं प्रदर्शित होताच नेटकऱ्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या. या गाण्यातली दीपिका आणि शाहरुखची केमिस्ट्री आणि त्यांचा बोल्ड अंदाज नेटकऱ्यांना चांगलाच भावला. मात्र दुसरीकडे या गाण्याची सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. या गाण्यामुळे शाहरुख खानची थेट अभिजीत बिचुकलेशी तुलना केली गेली आहे.

आणखी वाचा : “कमी शिकलेले लोक…” ‘पठाण’ला पाठिंबा देत हनी सिंगचं मोठं वक्तव्य, ए. आर. रहमान यांच्या नावाचाही उल्लेख

‘झुमे जो पठाण’ हे गाणं प्रदर्शित झाल्यावर या गाण्याचे मीम्स तयार होत आहेत. त्यातून या गाण्याचं म्युझिक, कोरिओग्राफी, गाण्याचे बोल आणि विशेष करून शाहरुख खानचा लूक, त्याचे सिक्स पॅक अॅब्ज नेटकऱ्यांना अजिबात आवडले नाहीत असं ते सांगत आहेत.

शाहरुख खानची या गाण्यातील लूक पाहून अनेकांनी टिकटॉक स्वस्तातला टिकटॉक स्टार म्हटलं. तर त्याबरोबरच अनेकांनी त्याचे सिक्स पॅक पाहून नकली दिसत आहेत असं म्हणत त्याच्यावर टीका केली. इतकंच नव्हे तर एकाने शाहरूखची तुलना थेट अभिजीत बिचुकलेशी केली. “शाहरुख खान ‘पठाण’ चित्रपटात अभिजीत बिचुकलेची भूमिका सकारत आहे,” असं तो म्हणाला.

हेही वाचा : “सगळं आहे पण तू नाहीस…” शाहरुख खानला ‘पठाण’मध्ये हवा होता ‘हा’ आघाडीचा अभिनेता, व्यक्त केलं दुःख

दरम्यान ‘पठाण’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. हा एक अॅक्शन थ्रीलर चित्रपट आहे. शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social media users made comparison between abhijeet bichukle and shahrukh khan rnv