Seema Sajdeh Boyfriend : ‘फॅब्युलस लाईव्ह्स व्हर्सेस बॉलीवूड वाईव्ह्ज’चा तिसरा सीझन सुरू झाला आहे. यामध्ये सोहेल खानची पूर्वाश्रमीची पत्नी सीमा सजदेहने वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. दोन वर्षांपूर्वी सोहेलपासून घटस्फोट घेणारी सीमा आता एका प्रसिद्ध बिझनेसमनला डेट करतेय. सीमाने स्वतःच तिच्या बॉयफ्रेंडची ओळख करून दिली आहे. तिच्या बॉयफ्रेंडचे नाव विक्रम आहुजा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विक्रम आहुजा कोण आहे?

Who is Vikram Ahuja: विक्रम आहुजा हा बिझनेसमन आहे. तो बिझनेसमन देवेंद्र आहुजा यांचा मुलगा आहे. विक्रमने 20th सेंच्युरी फायनान्सचा एमडी म्हणून काम केलंय. तसेच तो सेंच्युरियन बँकेचा प्रमोटरही होता. विशेष म्हणजे सीमा आणि विक्रम यांचा १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला साखरपुडा झाला होता. पण लग्न होऊ शकलं नाही, त्यानंतर सीमाने सोहेल खानशी लग्न केलं. मात्र सीमा-सोहेलच्या घटस्फोटानंतर विक्रम व सीमा पुन्हा एकत्र आले आहेत. सीमाने या शोमध्ये महीप कपूर, भावना पांडे व नीलमला विक्रमची ओळख करून दिली.

प्रसिद्ध अभिनेता १३ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात, कबुली देत लग्नाबाबत म्हणाला, “मी हे नातं…”

विक्रम आहुजाचे देओल कुटुंबाशी कनेक्शन

सीमा सजदेहचा बॉयफ्रेंड असणं हे विक्रम आहुजाचं एकमेव बॉलीवूड कनेक्शन नाही. इंडियाटाइम्सच्या वृत्तानुसार, बॉबी देओलची पत्नी तान्या ही विक्रमची बहीण आहे. विक्रम हा बॉबीचा मेहुणा आहे. देओल व आहुजा कुटुंबाचे जवळचे संबंध आहेत. अनेकदा दोन्ही कुटुंब एकत्र दिसतात.

सूरज चव्हाण सहानुभूतीमुळे बिग बॉस जिंकला, या टीकेवर निक्की तांबोळी म्हणाली, “मी ट्रॉफी उचलली असती तर…”

सीमा सजदेह (फोटो – इन्स्टाग्राम)

सीमा सजदेह व सोहेल खान यांचा घटस्फोट

सीमाने सोहेलच्या प्रेमात पडल्यावर अवघ्या तीन महिन्यात पळून जात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. सीमा व सोहेल खान दोघांनी १९९८ मध्ये पळून जाऊन लग्न केलं होतं. २४ वर्षे संसार केल्यानंतर ते २०२२ मध्ये विभक्त झाले. त्यांना निर्वाण व योहान ही दोन मुलं आहेत. नुकतंच सीमाने ‘फॅब्युलस लाईव्ह्स व्हर्सेस बॉलीवूड वाईव्ह्ज’ मध्ये घटस्फोटानंतर आयुष्यात पुढे जाण्याच्या महत्त्वाबद्दल सांगितलं.

हेही वाचा – ‘झापूक झुपूक’ सूरज चव्हाण अन् गौतमी पाटीलची भेट, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “भावाने मार्केट जाम केलंय”

‘फॅब्यूलस लाइव्ह्ज वर्सेस बॉलीवूड वाइव्स’ चा तिसरा सीझन १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा शो ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. या सीरिजमध्ये नीलम कोठारी, रिद्धिमा कपूर, कल्याणी साहा चावला व शालिनी पस्सीसह इतर काही लोकप्रिय सेलिब्रिटी सहभागी झाल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sohail khan ex wife seema sajdeh is dating vikram ahuja tyanya deol brother hrc