अभिनेता सलमान खानने सिनेमात प्रेम म्हणून रोमँटिक हिरो साकारत अनेक अभिनेत्रींबरोबर रोमान्स केला असला तरी भाईजानला त्याच्या खऱ्या आयुष्यातलं खरं प्रेम आजवर मिळालं नाही. सलमानची अनेक प्रेमप्रकरणं झाली, त्याच्या बऱ्याच चर्चा झाल्या, पण चाहत्यांच्या लाडक्या भाईजानचं लग्न कधी जुळणार, हा प्रश्न आजही चर्चेत असतो. एकदा सलमानचं लग्न जुळलं होतं, मात्र ते लग्न पुढे मोडलं. जिच्यामुळे हे लग्न मोडलं होतं, खुद्द तिनेच हा किस्सा सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री संगीता बिजलानी आणि सलमान खान यांचे एकेकाळी प्रेमसंबंध होते. ऐश्वर्या रायच्या आधी सलमानच्या आयुष्यात आलेल्या या प्रेमसंबंधांबद्दल माध्यमांत आणि चाहत्यांमध्ये चर्चा होती. संगीता आणि सलमानचं अफेअर इतकं पुढे गेलं होतं की त्यांचं लग्न ठरलं होतं आणि पत्रिकादेखील छापल्या गेल्या होत्या. पण, या नात्यात तिसरी व्यक्ती आली आणि हे नातं तुटलं. संगीता बिजलानीने सलमानला दुसऱ्या अभिनेत्रीबरोबर पकडलं आणि हे लग्न मोडलं. हा किस्सा खुद्द त्या अभिनेत्रीने सांगितला आहे. ती अभिनेत्री म्हणजे सोमी अली.

हेही वाचा…मुन्नाभाई MBBS मध्ये संजय दत्तऐवजी शाहरुख खान, तर अर्शदच्या जागी ‘हा’ मराठी अभिनेता करणार होता काम, पण…

सोमी अलीने नुकत्याच ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत सलमानचं लग्न तिच्यामुळे कसं मोडलं हा किस्सा सांगितला आहे. सोमी म्हणाली, “मी आणि सलमान खान एका सिनेमाचं शूटिंग करत होतो. या सिनेमाचं शूटिंग उत्तर प्रदेशात सुरू होतं. मात्र, हा सिनेमा कधीच प्रदर्शित झाला नाही.”

असं मोडलं सलमानचं लग्न

सोमी अली म्हणाली, “सलमान खान पाइपवरून चढून माझ्या खोलीत यायचा. मला सलमानची ही शैली खूप रोमँटिक वाटायची. असाच एक दिवस सलमान माझ्या खोलीत आला. साधारण साडे-दहाच्या सुमारास तो आला. तेव्हा तो संगीता बिजलानीबरोबर रिलेशनशिपमध्ये होता. त्यांच्या लग्नाच्या पत्रिकाही छापल्या गेल्या होत्या. सलमान आणि मी खोलीत गप्पा मारत होतो, तेवढ्यात अचानक संगीता बिजलानी तिथे आली. तिने सलमानकडे पाहिलं आणि म्हणाली, ‘तर हे प्रकरण असं आहे.’ आता त्याला ठरवायचं होतं. सलमानने मला सांगितलं की तो १० मिनिटांत परत येईल. मला वाटलं की तो संगीता बिजलानीशी लग्न करेल, कारण पत्रिका छापल्या गेल्या होत्या, पण तसं झालं नाही.”

सोमी अलीने पुढे सांगितलं, “सलमान परत आला आणि त्याने सांगितलं की त्याचं संगीता बिजलानीबरोबर ब्रेकअप झालं आहे आणि त्याला माझ्याबरोबर राहायचं आहे. मला वाटलं की हे माझं भाग्य आहे.”

हेही वाचा…स्वतःचा अभिनय दाखवायला करीना कपूरने ठेवलेला चित्रपटाचा खास शो, पण घडलं उलट; किस्सा सांगत म्हणाली…

सलमान खानसोबतच्या संस्मरणीय क्षणांबद्दल सोमी अली म्हणते, “जेव्हा आम्ही आमचा पहिला चित्रपट एकत्र शूट करत होतो, तेव्हा मी सलमानला एक फोटो दाखवला आणि सांगितलं की, मी त्याच्याशी लग्न करण्यासाठी भारतात आले आहे आणि मला अभिनयात रस नाही. तो हसला आणि मला म्हणाला की, त्याची आधीच एक गर्लफ्रेंड आहे. त्यानंतर मी सलमानला सांगितलं, ‘काही फरक पडत नाही, आपण एकत्र राहणार आहोत. आमच्या नशिबात हेच लिहिलं आहे.’ पण, असं झालं नाही. मी फक्त एक मूर्ख मुलगी होते, जी फ्लोरिडा सोडून सलमान खानसाठी भारतात आली होती; असं कोण करतं?”

हेही वाचा…अभिनेत्री सैयामी खेरची मोठी कामगिरी, आयर्नमॅन ७०.३ शर्यत केली पूर्ण; अनुराग कश्यपने शेअर केली पोस्ट

सोमीने संगीताची माफी मागितली…

सोमी अलीने सांगितलं की, त्यांनी अनेक वर्षांनंतर सलमान खानचं लग्न मोडल्याबद्दल संगीता बिजलानीची माफी मागितली होती. “मी तिला बोलून सांगितलं की, मी जे केलं त्यासाठी मला खूप वाईट वाटतंय. मला माझीच लाज वाटते आहे. मी तेव्हा खूप लहान होते. मला कळत नव्हतं की मी काय करत होते.” त्यावर संगीता बिजलानी म्हणाली, “मला त्याचं आता काहीच वाटत नाही, मी अजहरबरोबर माझ्या वैवाहिक जीवनात आनंदी आहे.” पण, त्यानंतर पुढच्या महिन्यात संगीता बिजलानीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला, जेव्हा सलमान खान ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटात ऐश्वर्या रायबरोबर काम करत होता, तेव्हा सोमी अलीला जाणवलं की, तिच्या निघून जाण्याची वेळ आली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Somy ali reveals she was the reason behind in breaking salman khan and sangeeta bijlani marriage psg