अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून पुन्हा एकदा जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. तर, अभिनेता सध्या हैदराबादमध्ये आगामी ‘सिंकदर’ चित्रपटाचं शूटिंग करतोय. याच दरम्यान त्याची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री सोमी अलीने त्याच्याबरोबरच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. त्याला ‘वन नाईट स्टँड’ ची सवय होती, असा दावा तिने केला आहे. १९९० च्या दशकात सलमानला डेट करणाऱ्या सोमीने रेडिटच्या एमएमए सेशनमध्ये तिचे रिलेशनशिप आणि बॉलीवूडच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

सोमी अलीने १९९३ मध्ये ‘अंत’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. सलमानच्या बेवफाईमुळे नातं संपवलं होतं, असं तिने म्हटलंय. सलमानबरोबर ती रिलेशनशिपमध्ये असताना नेमकं काय बिनसलं, असं तिला एका युजरने विचारलं. त्यावर सोमीने लिहिलं, “कारण मी सलमानच्या वन नाईट स्टँडला कंटाळले होते. तसेच मी दररोज त्याचा शारीरिक अत्याचार आणि शिवीगाळ सहन करू शकत नव्हते.” सलमानने तिच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये असताना ८ वेळा फसवणूक केली, असंही ती म्हणाली.

sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
rishi kapoor got upset with rajesh Khanna after he proposed to dimple kapadia
डिंपल यांच्या हातात होती ऋषी कपूर यांची अंगठी; राजेश खन्नांनी प्रपोज करताना ‘ती’ अंगठी पाहिली अन्…; पुढे काय घडलं? वाचा
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Bollywood Actors Salman Khan ex-girlfriend Somy Ali claimed that Sushant Singh Rajput was murdered
“सुशांत सिंह राजपूतची हत्याच केली”, सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने केला दावा; म्हणाली, “एम्सच्या डॉक्टरांनी…”
Indias most expensive film flopped after row over same sex kiss
दोन अभिनेत्रींमधील किसिंग सीनमुळे वाद, दिग्दर्शकाचं करिअर संपलं; तब्बल १० कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले फक्त…

हेही वाचा – दोन अभिनेत्रींमधील किसिंग सीनमुळे वाद, दिग्दर्शकाचं करिअर संपलं; तब्बल १० कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले फक्त…

सोमी म्हणाली की सलमानच्या आयुष्यात ऐश आल्यावर तिने त्याला सोडलं. मला बॉलीवूड सोडल्यानंतर अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या, मात्र मी त्याच्याबद्दल धक्कादायक खुलासे करेल, अशी सलमानला भीती होती त्यामुळे त्याने इंडस्ट्रीत परत येऊ दिलं नाही, असा दावा सोमीने केला.

somi ali salman khan
सोमी अली व सलमान खान (फोटो – स्क्रीनशॉट)

सोमी ऐश्वर्या रायबद्दल म्हणाली…

सोमीने ऐश्वर्या राय बच्चन व सलमानच्या नात्यावरही भाष्य केलं. सलमानची एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या रायबद्दल विचारल्यावर ती म्हणाली, “ऐश्वर्या राय खूप चांगली व्यक्ती आहे आणि ती सलमानबरोबर असताना तिच्यासोबत जे घडलं, त्याचं मला खूप वाईट वाटतं.”

हेही वाचा – फिल्मी करिअर ठरलं फ्लॉप, दोन वर्षापूर्वी प्रसिद्ध क्रिकेटपटूशी केलं लग्न; या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का?

लॉरेन्स बिश्नोई बॉलीवूडचा दाऊद – सोमी अली

सोमीने अंडरवर्ल्ड व बॉलीवूडच्या कनेक्शनबद्दल वक्तव्य केलं. तसेच सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईबद्दल ती म्हणाली, “लॉरेन्स बिश्नोई हा बॉलीवूडचा दाऊद आहे.” बॉलीवूडमध्ये काम करत असताना अंडरवर्ल्डसंदर्भातील तिच्या अनुभवांबद्दल तिला काही प्रश्न विचारण्यात आले. “मी माणुसकी सर्वात चांगला आणि सर्वात वाईट काळ अनुभवला आहे. मला धमकावलं गेलं आणि मला गप्प राहण्यासाठी मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आली,” असं सोमी म्हणाली.

Story img Loader