बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नेहमी चर्चेत असते. सोनाक्षी कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या अफेअरच्या बातम्यांमुळे चर्चेत असते. दरम्यान, सोनाक्षीच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. सोनाक्षीने मुंबईत नवीन घर घेतले आहे. या नव्या घराची किंमत करोडो रुपयांमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा- “आपण सगळे ढोंगी…” सेक्सविषयी संभाषण न करणाऱ्या भारतीयांबद्दल अनुराग कश्यपचं वक्तव्य चर्चेत

Tejaswini Bhavan in Akola built with contributions from mahila bachat gat and Sadhan Kendra
अकोला : बचत गटातील महिलांच्या योगदानातून ‘तेजस्विनी’ महाराष्ट्रातील एकमेव पथदर्शी उपक्रम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
in Mumbai 55 percent increase in price of affordable homes
मुंबई महानगरातील परवडणाऱ्या घरांच्या किमतीत ५५ टक्के वाढ!
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
MHADA to build seven storey old age home in Majiwada Thane Mumbai news
ठाण्यातील माजीवाड्यात म्हाडा बांधणार सात मजली वृद्धाश्रम; नोकरदार महिलांसाठी वसतीगृही बांधणार
MHADA Konkan Mandal special campaign extended Mumbai news
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विशेष मोहिमेला मुदतवाढ, शुक्रवारपर्यंत २९ स्टाॅलच्या माध्यमातून घरविक्री
CIDCO considers extending lottery process for 26 000 houses under My Favorite CIDCO House scheme
२६ हजार घरांच्या सोडत प्रक्रियेस मुदतवाढीचा प्रस्ताव विचाराधीन
Panvel Virar House expensive , House expensive Panvel,
पाच वर्षात पनवेल, विरारची घरे महागली; दोन्ही ठिकाणच्या किमतीत ५८ टक्क्यांनी वाढ

सोनाक्षी सिन्हाने नवीन घर वांद्रे पश्चिम येथील रंग शारदा सभागृहाजवळ आहे. ४,२०० स्क्वेअर फूटमध्ये पसरलेल्या या घराची किंमत ११ कोटी रुपये आहे. वांद्राच्या केसी रोड जवळ असणाऱ्या इमारतीच्या २६ मजल्यावर सोनाक्षीचे नवे घर आहे. सोनाक्षीने यासाठी ५५ लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. सोनाक्षीच्या या नवीन अपार्टमेंटचा लॉबी एरिया ३४८.४३ स्क्वेअर फूट आहे. यामध्ये नोकरांसाठी वेगळं शौचालय आणि एअर हँडलिंग युनिटसाठीही जागा आहे. तसेच १,६५३ चौरस फूटाची अतिरिक्त जागाही आहे. अपार्टमेंटमध्ये चार कार पार्किंग करता येतील एवढी मोकळी जागा आहे. सोनाक्षीच्या नव्या फ्लॅटच्या बाल्कनीतून मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंक स्पष्टपणे दिसतो.

सोनाक्षी सिन्हाने यापूर्वी २०२१ मध्ये वांद्रे येथे 4BHK घर खरेदी केले होते. आता तिने आणखी एक नवीन घर घेतले आहे. त्याअगोदर सोनाक्षी तिच्या आई-वडिलांबरोबर त्यांच्या घरी राहत होती. शत्रुघ्न सिन्हा यांचे मुंबईत ‘रामायण’ नावाचे आलिशान घर आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी लग्नापूर्वी हे घर विकत घेतले होते. सोनाक्षी सिन्हा आणि तिचे भाऊ लव आणि कुश याच घरात वाढले. शत्रुघ्न सिन्हा त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह या घरात राहतात.

हेही वाचा- “अभिषेक बच्चनने मिरचीचा ठेचा भाजीसारखा खाल्ला आणि…”, सैयामी खेरने सांगितली पुण्यातील शूटिंगदरम्यानची आठवण

सोनाक्षी सिन्हाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, तिचा ‘डबल एक्सएल’ आणि ‘दहाड’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र, या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर म्हणावी तशी कामगिरी केली नव्हती. आता लवकच तिचा ‘बडे मियाँ-छोटे मियाँ’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader