बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही झहीर इक्बालबरोबर २३ जून रोजी लग्नबंधनात अडकली. अभिनेत्रीच्या घरी दोघांनी दोन्हीकडच्या कुटुंबांसमवेत अगदी साध्या व नोंदणी पद्धतीने विवाह केला. सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी ही गुड न्यूज चाहत्यांना दिली. आता सोनाक्षीचा एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही वर्षांपूर्वी सोनाक्षीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून दोन फोटो शेअर केले होते. त्या फोटोंवरून तिने साखरपुडा केलाय की काय, अशीही चर्चा सुरू झाली होती. ८ मे २०२२ रोजी म्हणजेच दोन वर्षांपूर्वी सोनाक्षीने आपला हात चेहऱ्यावर झाकत आणि अंगठी दाखवीत एक फोटो आणि एका व्यक्तीचा हात पकडत दुसरा फोटो शेअर केला होता. त्या वेळेस अनेकांना असेही वाटले होते की, अभिनेत्रीने हे कोणत्या तरी ज्वेलरी ब्रॅण्डच्या प्रमोशनसाठी हे फोटोशूट केले असावे. पण, आता चाहत्यांना खात्री पटली आहे की, सोनाक्षी आणि झहीरने दोन वर्षांपूर्वीच साखरपुडा केला होता.

हेही वाचा… लग्नानंतर पहिल्यांदाच सोनाक्षी सिन्हा पती झहीर इक्बालबरोबर गेली डिनर डेटला; मेहेंदीवरून नेटकऱ्यांनी केली शंका व्यक्त, म्हणाले…

सोनाक्षीने शेअर केलेले हे दोन फोटो त्यांच्या साखरपुड्यातलेच आहेत हे चाहत्यांना आता माहीत झाले आहे. कारण- अभिनेत्रीने तिच्या लग्नात तीच अंगठी घातली होती; जी दोन वर्षांपूर्वीं शेअर केल्या गेलेल्या फोटोंमध्येही आपल्याला पाहायला मिळाली होती. “माझ्यासाठी हा दिवस खास आहे. माझ्या सर्वांत मोठ्या स्वप्नांपैकी एक स्वप्न आता पूर्ण होत आहे आणि मी हे स्वप्न तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. हे इतके सोपे असेल यावर माझा विश्वास बसत नाही”, असं कॅप्शन सोनाक्षीने या फोटोंना त्यावेळी दिलं होतं.

विवाहबंधनात अडकल्यावर सोनाक्षीने तिचे आणि झहीरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत ही गुड न्यूज चाहत्यांना दिली. सोनाक्षीने लग्नासाठी ऑफ व्हाईट रंगाची चिकनकारी साडी नेसली होती. केसात गजरा, गोल्डन ज्वेलरी व मिनिमल मेकअप यांत नववधूचे सौंदर्य अगदी खुलून दिसत होते. सोनाक्षीने या खास दिवशी तिच्या आईची म्हणजेच पूनम यांची साडी नेसली होती. झहीरने सोनाक्षीला मॅचिंग करीत डिझायनर कुर्ता परिधान केला होता.

हेही वाचा… चांदीचं मंदिर अन् सोनेरी मूर्ती…, ‘अशी’ आहे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटची लग्नपत्रिका, पाहा VIDEO

दरम्यान, सोनाक्षी आणि झहीरच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगायचं झालं तर, २३ जून २०१७ पासून दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी मुंबईमध्ये नोंदणी पद्धतीने लग्न केले. तर, मुंबईतील बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये त्यांच्या रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonakshi sinha engaged to zaheer iqbal two years ago photos viral dvr