Sonakshi Sinha And Zaheer Iqbal Reception : बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचा विवाहसोहळा २३ जून रोजी नोंदणी पद्धतीने पार पडला. गेल्या काही दिवसांपासून सोनाक्षीच्या लग्नासंदर्भात चर्चा रंगल्या होत्या. अखेर नोंदणी पद्धतीने विवाह केल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून अभिनेत्रीने तिच्या सगळ्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. सोनाक्षी आणि झहीर यांच्या लग्नाला दोघांचे कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि काही मोजके मित्रमंडळी उपस्थित होते.

सोनाक्षीने नोंदणी पद्धतीने विवाह केल्यावर सायंकाळी बॉलीवूडकरांसाठी ग्रँड रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. अभिनेत्रीच्या रिसेप्शनला रेखा, अदिती राव हैदरी, सिद्धार्थ, अनिल कपूर, सलमान खान, अर्पिता खान, रिचा चड्ढा, अली फजल, रवीना टंडन, शर्मिन सेगल, काजोल असे अनेक कलाकार उपस्थित होते. त्यांच्या रिसेप्शन सोहळ्याला एकंदर बॉलीवूडकरांची मांदियाळी पाहायला मिळाली. सध्या या पार्टीतले अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच अभिनेत्री काजोलच्या एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…
a husband expressing love for his wife in front of family
असा नवरा भेटायला नशीब लागतं! कुटुंबासमोर व्यक्त केलं बायकोवरचं प्रेम, पाहा Viral Video
keerthy suresh antony thattil wedding
नागा चैतन्य-सोभितानंतर आणखी एक अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, बॉयफ्रेंडबरोबर पोहोचली गोव्यात; पत्रिका पाहिलीत का?

हेही वाचा : Videos: सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या रिसेप्शनला सेलिब्रिटींची मांदियाळी! रेखा, सायरा बानू, सलमान खानसह पोहोचले ‘हे’ स्टार्स

काजोल सोनाक्षी सिन्हाला नववधूच्या रुपात पाहताच अगदीच भारावून गेली होती. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ‘फिल्मीग्यान’ या पापाराझी इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सोनाक्षीला पाहून काजोलने आपले दोन्ही हात गालावर ठेवून भारावून गेल्याची प्रतिक्रिया दिली. तिचे डोळे देखील पाणावले होते. सोनाक्षीने रिसेप्शन पार्टीला सुंदर अशी लाल रंगाची साडी, त्यावर साजेसे पारंपरिक दागिने केसात गजरा, हातावर मेहंदी असा लूक केला होता.

काजोल आणि सोनाक्षीने या पार्टीत एकमेकींना घट्ट मिठी मारली. यावेळी सोनाक्षी देखील भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर या नवीन जोडप्याने काजोलबरोबर डान्स केला. काजोल आणि सोनाक्षीचं हे सुंदर बॉण्डिंग याआधी कोणीही पाहिलेलं नव्हतं. त्यामुळे नेटकऱ्यांनी सुद्धा त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : आईची साडी, गळ्यात फक्त १ हार अन् केसात…; सोनाक्षी सिन्हाने नोंदणी पद्धतीने विवाह करताना केला ‘असा’ लूक

दरम्यान, सोनाक्षी आणि झहीर २३ जून २०१७ पासून म्हणजेच गेली ७ वर्षे एकमेकांबरोबर आहेत. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यावर या जोडप्याने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आणि २३ जून २०२४ रोजी नोंदणी पद्धतीत लग्न करून विवाहबंधनात अडकले.

Story img Loader