Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding: बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा व अभिनेता झहीर इक्बाल यांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. मुंबईत दोघेही कुटुंबीय व जवळच्या लोकांच्या उपस्थितीत विवाह बंधनात अडकले. सोनाक्षीने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे. फोटोंमध्ये सोनाक्षी व झहीरच्या कुटुंबियांची झलक पाहायला मिळत आहे.

सोनाक्षी व झहीर यांच्या लग्नातील काही व्हिडीओदेखील आता व्हायरल होत आहेत. सोनाक्षीने लग्नासाठी ऑफ व्हाइट रंगाची साडी निवडली. ही साडी तिची आई पूनम सिन्हा यांची आहे. या साडीत सोनाक्षी खूपच सुंदर दिसत आहे. तिने लग्नात अगदी साधा लूक केला. तिने साडीवर मॅचिंग नेकलेस व कानातले घातले होते. तर जहीरने सोनाक्षीसोबत ट्विनिंग करत पांढरा कुर्ता घातला.

सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बालनं नोंदणी पद्धतीनं केलं लग्न, अभिनेत्री खास क्षणांचे फोटो शेअर करत म्हणाली, “सात वर्षांपूर्वी…”

सोनाक्षी व झहीरच्या नोंदणी पद्धतीच्या लग्नातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात झहीर त्याचे सासरे म्हणजेच दिग्गज बॉलीवूड अभिनेते व टीएमसी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या पाया पडून आशीर्वाद घेताना दिसत आहे. नंतर तो सासूबाई पूनम सिन्हा यांचेही आशीर्वाद घेतो. मग तो सोनाक्षीला मिठी मारतो. झहीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

विजय मल्ल्याच्या लेकानं ख्रिश्चन पद्धतीनं गर्लफ्रेंडशी केलं लग्न, पहिला फोटो आला समोर

झहीरचा हा व्हिडीओ पाहून चाहते त्याचं कौतुक करत आहेत. अनेकांनी या जोडप्याला सहजीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘ते एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करतात. हेच खरं प्रेम’, अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर आणखी एक युजरने ‘आई-वडिलांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या मुलीचा आनंद,’ अशी कमेंट केली आहे.

झहीर इक्बालच्या व्हिडीओवरील नेटकऱ्यांच्या कमेंट्स

सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल एकमेकांना सात वर्षांपासून डेट करत होते. अखेर दोघेही लग्नबंधनात अडकले आहेत. सोनाक्षी व झहीर यांचे धर्म वेगळे असल्याने त्यांनी विशेष विवाह कायद्यांतर्गत नोंदणी पद्धतीने घरीच लग्न केलं. त्यानंतर दोघांचं जंगी रिसेप्शन हॉटेलमध्ये पार पडलं. सोनाक्षी व झहीर यांच्या रिसेप्शनमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दोघांच्या रिसेप्शनला काजोल, अदिती राव हैदरी, हुमा कुरेशी, साकिब सलीम, रवीना टंडन, हनी सिंग, वर्धन पुरी, सायरो बानो यांनी हजेरी लावली.