बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी लग्न करणार असल्याच्या चर्चा होत आहेत. सोनाक्षी तिचा बॉयफ्रेंड जहीर इक्बाल याच्याशी २३ जूनला मुंबईत लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. आता सोनाक्षीची लग्नाबद्दल प्रतिक्रिया समोर आली आहे. लग्नाच्या प्रश्नांकडे फार लक्ष देत नसल्याचं एका मुलाखतीत सोनाक्षीने म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आय दिवा’ ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षी लग्नाबद्दल म्हणाली, “मला याबद्दल नेहमी विचारलं जातं आणि आता असं वाटतं की मी ते एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडून देते. सर्वात पहिली गोष्ट की माझ्या लग्नाबद्दल बोलणं हे कुणाचंही काम नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ही माझी निवड आहे, त्यामुळे लोक त्याबद्दल इतके का विचार करत आहेत हेच मला कळत नाही. मला माझ्या आई- वडिलांपेक्षा इतर लोक लग्नाबद्दल जास्त विचारतात, म्हणून मला ते खूप मजेदार वाटतं. आता मला त्याची सवय झाली आहे. त्याचा मला त्रास होत नाही. लोक उत्सुक आहेत…मी तरी काय करू शकते.”

सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “आजकालची मुलं आई-वडिलांची…”

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांचं लग्न २३ जूनला होणार आहे. त्यांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या लग्नात त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त ‘हीरामंडी’च्या सर्व कलाकारांना लग्नासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. सोनाक्षी व झहीर यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका खास पद्धतीने डिझाइन करण्यात आली आहे, असं म्हटलं जात आहे. पत्रिकेच्या पहिल्या पानावर ‘अफवा खऱ्या आहेत’ असं लिहिलं आहे. तसेच सर्व पाहुण्यांना फॉर्मल्समध्ये लग्नात येण्यास सांगितलं आहे. या दोघांच्या लग्नाचा सोहळा मुंबईतील बास्टियन येथे होणार आहे, अशी माहितीही समोर आली आहे. पण याबाबत झहीर किंवा सोनाक्षी अद्याप काहीच बोललेले नाहीत.

बॉयफ्रेंडपेक्षा वयाने मोठी आहे सोनाक्षी सिन्हा, अभिनेत्री ३७ वर्षांची तर झहीर इक्बालचं वय…

सोनाक्षीच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आल्यानंतर याबद्दल तिचे वडील, दिग्गज अभिनेते व नवनिर्वाचित खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी सध्या दिल्लीत आहे. माझं मुलीच्या लग्नाच्या प्लॅन्सबद्दल काहीच बोलणं झालेलं नाही. तर तुमचा प्रश्न आहे, ती लग्न करणार आहे का? उत्तर असं आहे की तिने मला याबद्दल काहीही सांगितलेलं नाही. मी जेवढं माध्यमांमध्ये आलंय तेवढंच वाचलं आहे. जर आणि जेव्हा ती मला आणि माझ्या पत्नीला याबद्दल विश्वासात घेऊन सांगेल, तेव्हा आम्ही जोडप्याला आशीर्वाद देऊ. ती नेहमी आनंदी राहो, याच शुभेच्छा,” असं शत्रुघ्न सिन्हा ‘टाईम्स नाऊ’शी बोलताना म्हणाले.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी करणार लग्न, तारीख ठरली

सोनाक्षीच्या लग्नाच्या बातम्या समोर आल्यानंतर खूप जण फोन करत आहेत, पण लग्नाबद्दल मला फार माहिती नाही, असं त्यांनी सांगितलं. “माझ्या जवळचे लोक मला लग्नाबद्दल विचारत आहेत की मला या कथित लग्नाबद्दल का माहीत नाही आणि मीडियाला याबद्दल माहीत आहे. यावर मी फक्त इतकंच म्हणू शकतो की आजकालची मुलं आई-वडिलांची परवानगी घेत नाहीत, तर त्यांना कळवतात. आम्हीही त्याचीच वाट पाहत आहोत,” असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonakshi sinha reacts on being asked about marriage amid wedding rumours with zaheer iqbal hrc