सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल हे जोडपं त्यांच्या लग्नापासून चर्चेत आहे. दोघांनी २३ जून २०२४ रोजी नोंदणी पद्धतीने लग्न केलं आणि त्याच दिवशी मुंबईत त्यांचा जंगी रिसेप्शन सोहळा पार पडला. सोनाक्षी व झहीर लग्नानंतर दुसऱ्या आठवड्यात रुग्णालयात जाताना पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले होते, त्यानंतर अभिनेत्री गरोदर असल्याच्या चर्चा होऊ लागल्या. सोनाक्षी गरोदर असल्यानेच त्यांनी लवकर लग्न केलं असंही म्हटलं जात होतं. आता सोनाक्षीने या सर्व अफवांवर पूर्णविराम लावला आहे.
सोनाक्षीने एका मुलाखतीत तिच्या गरोदरपणाच्या वृत्तावर मौन सोडलं आहे. तसेच अफवा पसरवणाऱ्यांनाही तिने सुनावलं आहे. ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षी म्हणाली, “आता बदल एवढाच झाला आहे की आम्ही रुग्णालयात जाऊ शकत नाही कारण आम्ही घरातून रुग्णालयात जाण्यासाठी निघालो की लोकांना वाटतं की मी गरोदर आहे. एवढाच फरक आहे.”
सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांची प्रकृती खालावली होती. त्यांना ताप आला होता आणि अशक्तपणा होता, त्यामुळे काही दिवस ते रुग्णालयात होते. अभिनेत्री लग्नानंतर पतीबरोबर वडिलांना भेटायला रुग्णालयात गेली होती, पण लोकांना वाटलं की ती गरोदर आहे. त्यामुळे तिने या अफवांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे आणि तिच्याकडे गुड न्यूज नसल्याचं तिने स्पष्ट केलं आहे.
सोनाक्षी व झहीर लग्नानंतर फिरायला गेले आहेत. दोघेही व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्याशिवाय लग्नातील काही न पाहिलेले फोटोही अभिनेत्रीने शेअर केले आहेत. लग्नाच्या दिवशी लेक घरातून जाणार यामुळे तिची आई पूनम सिन्हा भावुक झाल्या होत्या, तेव्हा आईला मिठी मारून धीर देतानाचे फोटो सोनाक्षीने नुकतेच शेअर केले.
नवविवाहित सोनाक्षी सिन्हा व तिचा पती झहीर इक्बाल यांचे शिक्षण किती? जाणून घ्या
सोनाक्षीच्या लग्नाला एका भावाची हजेरी, दुसरा गैरहजर
दरम्यान, सोनाक्षीच्या लग्नात तिचा भाऊ लव सिन्हा न गेल्याने विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आलं होतं. सोनाक्षीला लव व कुश नावाचे दोन जुळे भाऊ आहेत. त्यापैकी लव सिन्हा लग्नाला गैरहजर होता. तर कुश सिन्हा लग्नाला उपस्थित होता. त्याने स्वतःच याबाबत माहिती दिली होती. तर लव झहीरच्या वडिलांमुळे या लग्नाला गेला नव्हता असं त्याने सांगितलं. लव वडिलांप्रमाणे राजकारणात सक्रिय आहे. झहीरच्या वडिलांचे ईडीची नोटिस आलेल्या एका राजकारण्याची जवळचे संबंध होते, असं लवने एक्सवर पोस्ट करत म्हटलं होतं.