अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने २३ जून २०२४ रोजी झहीर इक्बालशी लग्न केलं. सकाळी नोंदणी पद्धतीने लग्न केल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी त्यांचा रिसेप्शन सोहळा बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये पार पडला होता. त्यांच्या लग्नाला मोजकेच लोक उपस्थित होते, पण रिसेप्शनला रेखा, सलमान खान, अनिल कपूर, सायरा बानू यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तिच्या रिसेप्शनची झलक पाहायला मिळत आहे. व्हिडीओची सुरुवात नवविवाहित जोडप्याच्या त्यांच्या रिसेप्शनच्या ठिकाणी एंट्रीने होते. त्यानंतर सोनाक्षी तिची जिवलग मैत्रीण हुमा कुरेशीला मिठी मारताना दिसते. तसेच ती काजोलबरोबर सेल्फीसाठी पोज देताना, अनिल कपूरसोबत नाचताना, सलमान खानला मिठी मारताना आणि नंतर भावनिक रेखाला धीर देताना दिसते. “रोना मत” (रडू नका) असं ती भावुक रेखा यांना म्हणते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

नवविवाहित सोनाक्षी सिन्हा व तिचा पती झहीर इक्बाल यांचे शिक्षण किती? जाणून घ्या

या व्हिडीओमध्ये जवळपास सर्वच पाहुण्यांची झलक पाहायला मिळते. राजकुमार राव, अरबाज खान, आयुष शर्मा, सिद्धार्थ, अदिती राव हैदरी यांच्यासह अनेक पाहुणे ‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘ये काली काली आँखे’ सारख्या गाण्यांवर थिरकताना दिसतात. व्हिडीओत एका ठिकाणी सोनाक्षीची आई पूनम सिन्हा तिच्या गालावर किस करताना आणि नंतर सोनाक्षी तिच्या वडिलांबरोबर पोज देताना दिसत आहे. या व्हिडीओत सोनाक्षीचा खास मित्र व रॅपर हनी सिंग याच्या परफॉर्म्सची झलक पाहायला मिळते.

“आम्ही कोणाच्या पोटी जन्मलो?” सरोगसीद्वारे जन्मलेली जुळी मुलं विचारतात प्रश्न; करण जोहर म्हणाला, “ही परिस्थिती…”

आपल्या लग्नाच्या फोटोंच्या कमेंट्स बंद करणाऱ्या या जोडप्याने रिसेप्शनचा व्हिडीओ शेअर करताना मात्र कमेंट्स ऑन ठेवल्या. त्यांच्या या व्हिडीओवर बॉलीवूड सेलिब्रिटींसह चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. त्यांना या व्हिडीओसाठी चाहत्यांचं खूप प्रेम मिळत आहे. सोनाक्षी आणि झहीरच्या रिसेप्शन पार्टीतील या सुंदर क्षणांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. या पोस्टवर कमेंट्सचा पूर आला. ‘हा व्हिडीओ खरा आणि सुंदर आहे. आतापर्यंतच्या सेलिब्रिटींच्या लग्नातील सर्वात सुंदर व्हिडीओ,’, ‘खरा आणि सुंदर’, ‘आदर्श जोडप्याचे परफेक्ट उदाहरण’, अशा कमेंट्स यावर चाहत्यांनी केल्या आहेत.

सोनाक्षी-झहीरच्या लग्नाला मुलाच्या गैरहजेरीबद्दल शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “आमच्या कुटुंबाचे नाव खराब…”

सोनाक्षी व झहीर सात वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोघांच्या आंतरधर्मीय लग्नामुळे त्यांना खूप ट्रोल करण्यात आलं. ट्रोलर्सना सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी सुनावलं होतं. तिच्या लग्नाला व रिसेप्शनला तिचे आई-वडील होते पण तिचा भाऊ लव सिन्हा अनुपस्थित होता.

Story img Loader