२०१० मध्ये सलमान खानच्या ‘दबंग’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवणारी रज्जो म्हणजेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ( Sonakshi Sinha ) नेहमी चर्चेत असते. कधी तिच्या कामामुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. सोनाक्षी तिच्या बिनधास्त आणि स्पष्टवक्तेपणामुळे अधिक ओळखली जाते. अभिनेत्री तिचे विचार उघडपणे व्यक्त करतं असते. गेल्या वर्षी सोनाक्षी मुस्लीम अभिनेता झहीर इक्बालबरोबर ( Zaheer Iqbal ) लग्नबंधनात अडकली. २३ जून २०२४ रोजी दोघांचं नोंदणी पद्धतीनं लग्न झालं होतं. दोन्ही कुटुंबियांच्या आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. पण मुस्लीम मुलाशी लग्न केल्यामुळे सोनाक्षीला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र याकडे तिनं दुर्लक्ष केलं.
लग्न झाल्यापासून सोनाक्षी सिन्हा ( Sonakshi Sinha ) झहीर इक्बालबरोबर ठिकठिकाणी फिरताना दिसतं आहे. ती नेहमी सोशल मीडियावर नवऱ्याबरोबर रोमँटिक फोटो शेअर करत असते. अशाच एका फोटोवर एका नेटकऱ्यानं केलेल्या कमेंटवरून सोनाक्षी सिन्हा भडकलेली पाहायला मिळाली. तिनं नेटकऱ्याला चांगलंच उत्तर दिलं.
एका नेटकऱ्यानं सोनाक्षी आणि झहीरच्या घटस्फोटावर कमेंट केली. त्यानं लिहिलं, ‘तुमचा घटस्फोटही लवकरच होईल.’ घटस्फोट हा शब्द वाचताच सोनाक्षी संतापली आणि तिनं ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर दिलं. सोनाक्षी सिन्हा ( Sonakshi Sinha ) त्या नेटकऱ्याला म्हणाली, “पहिले तुझे आई-वडील करणार आणि नंतर आम्ही…नक्कीच.” सोनाक्षीनं नेटकऱ्याला दिलेल्या या प्रत्युत्तराची चर्चा सध्या खूप होतं आहे. तिचे व झहीरचे चाहते दोघांना समर्थन करत आहेत. चाहते सोनाक्षी व झहीरची परफेक्ट जोडी असल्याचं म्हणत आहेत.
दरम्यान, सोनाक्षी सिन्हा ( Sonakshi Sinha ) व झहीर इक्बाल जवळपास सात वर्षे एकमेकांना डेटिंग करत होते. त्यानंतर दोघांनी संसार थाटण्याचा निर्णय घेतला. मुंबईत दोघांचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं. सोनाक्षीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटची ‘काकुडा’ चित्रपटात झळकली होती. हा चित्रपट तिच्या लग्नानंतर प्रदर्शित झाला होता.