बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हानं २३ जून रोजी झहीर इक्बालशी नोंदणी पद्धतीनं लग्न केलं. सोनाक्षीच्या घरी तिच्या आणि झहीरच्या कुटुंबासमवेत हा विवाह सोहळा पार पडला. नंतर मुंबईमध्ये रिसेप्शनचं आयोजन करीत बॉलीवूडमधल्या अनेक कलाकारांना सोनाक्षी-झहीर यांनी आमंत्रित केलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोनाक्षी आणि झहीर लग्नानंतर पहिल्यांदा आपल्या कुटुंबीयांसह मुंबईमधील एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते. यादरम्यानचे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आता नववधू सोनाक्षीनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर दोघांचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. सोनाक्षी आणि झहीरच्या या आंतरधर्मीय विवाहामुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. म्हणून अभिनेत्रीनं लग्न आणि स्वागत समारंभाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना कमेंट सेक्शनचा पर्याय बंद करून ठेवला होता. आता सोनाक्षीनं झहीरचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून शेअर केला आहे.

हेही वाचा… “नका करत जाऊ…”, ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकरांच्या ‘या’ व्हिडीओवर नेटकऱ्याची प्रतिक्रिया, म्हणाला…

सोनाक्षीनं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती अनवाणी चालताना दिसतेय. तिच्या थोडंसं पुढे झहीर चालताना दिसतोय. झहीर सोनाक्षीची हील्स त्याच्या हातात घेऊन चालताना दिसतोय. सोनाक्षी व्हिडीओ काढत असतानाच तो मागे वळून पाहतो. या व्हिडीओत झहीरनं राखाडी रंगाचं शर्ट आणि काळ्या रंगाची जीन्स घातली आहे.

हेही वाचा… शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल, मुलगा लव सिन्हा म्हणाला, “गेल्या काही दिवसांपासून…”

“When you marry the greenest flag ever” (जेव्हा तुम्ही ग्रीन फ्लॅग मुलाशी लग्न करता तेव्हा) असं कॅप्शन सोनाक्षीनं या व्हिडीओला दिलं आहे. सोनाक्षीनं शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/07/C1461C1978E288C6921C3DAB41CFD9BD_video_dashinit_7924c9.mp4

हेही वाचा… Virat Kohli T20 Retirement: विराट कोहलीने निवृत्तीची घोषणा करताच बॉलीवूडमधून हळहळ व्यक्त; रणवीर सिंगसह ‘या’ कलाकारांच्या सोशल मीडियावरील पोस्टची चर्चा

दरम्यान, सोनाक्षी आणि जहीरच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगायचं झालं तर, २३ जून २०१७ पासून दोघं रिलेशनशिपमध्ये होते. सात वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी सोनाक्षीच्या घरी नोंदणी पद्धतीनं लग्न केलं; तर मुंबईतील बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये त्यांच्या रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. सोनाक्षी आणि झहीरच्या रिसेप्शनला बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सलमान खान, रविना टंडन, अनिल कपूर, विद्या बालन, रिचा चड्ढा, काजोल असे अनेक कलाकार या कपलच्या रिसेप्शन पार्टीला उपस्थित होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonakshi sinha walking barefoot with zaheer iqbal shared video on social media dvr