Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : सोनाक्षी आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या. अखेर नोंदणी पद्धतीने विवाह करून अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे. सोनाक्षी आणि झहीरचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. हे दोघेही गेली सात वर्षे एकमेकांना डेट करत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोनाक्षी आणि झहीर २३ जून २०१७ पासून एकमेकांबरोबर आहेत. आज बरोबर सात वर्षांनी या जोडप्याने आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. दोघांचे कुटुंबीय, जवळचे मित्र-मैत्रिणी आणि काही मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा लग्नसोहळा नोंदणी पद्धतीने पार पडला. गेल्या काही दिवसांपासून शत्रुघ्न सिन्हांच्या लाडक्या लेकीच्या लग्नाची बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा चालू होती.

एवढेच नव्हे तर त्यांच्या घरी लेकीच्या लग्नासाठी खास सजावट देखील करण्यात आली होती. त्यामुळे प्रत्येकाचं लक्ष सोनाक्षीच्या लग्नाकडे लागलं होतं. अखेर नोंदणी पद्धतीने लग्न केल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून अभिनेत्रीने तिच्या सर्व चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

हेही वाचा : लग्नानंतर झहीर इक्बालने घेतले सासू-सासऱ्यांचे आशीर्वाद, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ते एकमेकांच्या संस्कृतीचा…”

सोनाक्षी आणि झहीर यांनी लग्नसोहळ्यात पेस्टल रंगाला पसंती दिली. अभिनेत्रीने खास ऑफ व्हाइट रंगाची साडी नेसली होती. तर झहीरने देखील पत्नीच्या साडीला मॅचिंग असा सदरा परिधान केला होता. त्याच्या सदऱ्यावर सुंदर असं भरतकाम केलं होतं. पण, या सगळ्यात सोनाक्षीच्या सुंदर साडीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अभिनेत्रीची साडी कोणत्याही डिझायनरने डिझाइन केलेली नव्हती.

सोनाक्षी सिन्हाने लग्नात नेसलेली साडी तिच्या आईची म्हणजेच पूनम यांची होती. या साडीवर अभिनेत्रीने गळ्यात एक हार घातला होता. याशिवाय सोनाक्षीच्या हातात सोनेरी रंगाच्या पारंपरिक वर्क असलेल्या बांगड्या होत्या. हे सगळे दागिने सुद्धा तिच्या आईचे होते. तसेच अभिनेत्रीने केसात पांढऱ्या रंगाची फुलं माळल्याचं यावेळी दिसून आलं. सुंदर साडी, कमीत कमी दागिने, साधा अन् सुंदर, लाइट शेड असलेली पिंक लिपस्टिक या लूकमध्ये सोनाक्षी अतिशय सुंदर दिसत होती.

हेही वाचा : सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बालनं नोंदणी पद्धतीनं केलं लग्न, अभिनेत्री खास क्षणांचे फोटो शेअर करत म्हणाली, “सात वर्षांपूर्वी…”

सोनाक्षी आणि झहीरसाठी २३ जून हा दिवस खूपच आहे. यामागचं कारण म्हणजे दोघांच्याही आयुष्यात या दिवसाला प्रचंड महत्त्व आहे. २०१७ मध्ये याच दिवशी ते एकत्र आले होते अन् आज बरोबर सात वर्षांनी लग्नबंधनात अडकले आहेत. दरम्यान, सध्या सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नातील बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये या क्यूट कपलचं बॉण्डिंग प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonakshi sinha wedding actress wears mother vintage saree and jewellery on registered marriage sva 00