अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल नुकतेच लग्नबंधनात अडकले. २३ जून रोजी दोघांनी कुटुंब आणि मित्रपरिवारासमवेत नोंदणी पद्धतीनं विवाह केला. त्यानंतर मुंबईमध्ये रिसेप्शनचं आयोजन करीत बॉलीवूडमधल्या अनेक कलाकारांना आमंत्रित केलं.
लग्नानंतर पहिल्यांदाच सोनाक्षी आणि झहीर त्यांच्या मित्रपरिवाराबरोबर डिनर डेटसाठी गेले होते. बुधवारी हे कपल मुंबईमधील एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते. दरम्यान, पापाराझींनी नवविवाहित जोडप्याचे फोटो आणि व्हिडीओ काढले; जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायत.
या डिनर डेटसाठी नववधू सोनाक्षीनं लाल रंगाचा स्लीक ड्रेस घातला होता. त्याचबरोबर हील्स, क्लच बॅग व हेअर बन अशी हेअरस्टाईल करीत अभिनेत्रीनं हा लूक पूर्ण केला होता; तर झहीरनं सफेद रंगाचा डिझायनर शर्ट घातला होता. रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करताच सोनाक्षी आणि झहीर यांनी त्यांच्या नातेवाइकांचं मिठी मारून स्वागत केलं.
हेही वाचा… चांदीचं मंदिर अन् सोनेरी मूर्ती…, ‘अशी’ आहे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटची लग्नपत्रिका, पाहा VIDEO
सोनाक्षी आणि जहीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या. एका नेटकऱ्याने कमेंट करत विचारलं, “दोनच दिवसांत सोनाक्षीची मेहंदी निघाली?” तर दुसऱ्याने “मेहेंदी गायब” अशी कमेंट केली.
सोनाक्षीनं रविवारी तिच्या घरी झहीरबरोबर नोंदणीकृत पद्धतीनं विवाह केला. अभिनेत्रीबरोबर तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा, आई पूनम सिन्हा आणि झहीरचे आई-वडील होते. लग्नानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी एक्स अकाउंटवर (पूर्वीचे ट्विटर) ट्वीट करीत ‘वेडिंग ऑफ द सेंच्युरी’, असं म्हणत सगळ्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल त्यांचे आभार मानले.
सोनाक्षीनं लग्नासाठी ऑफ व्हाईट रंगाची चिकनकारी साडी नेसली होती. केसात गजरा, गोल्डन ज्वेलरी व मिनिमल मेकअप यांत नववधूचं सौंदर्य अगदी खुलून दिसत होतं. सोनाक्षीनं या खास दिवशी तिच्या आईची म्हणजेच पूनम यांची साडी नेसली होती. झहीरनं सोनाक्षीला मॅचिंग करीत डिझायनर कुर्ता परिधान केला होता. सोनाक्षी-झहीरच्या रिसेप्शनला बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सलमान खान, रविना टंडन, अनिल कपूर, विद्या बालन, रिचा चड्ढा, काजोल अशा अनेक कलाकारांनीही हजेरी लावली होती.
दरम्यान, सोनाक्षी आणि झहीर यांच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगायचं झालं तर, २३ जून २०१७ पासून दोघं रिलेशनशिपमध्ये होते. सात वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी मुंबईमध्ये नोंदणी पद्धतीनं लग्न केलं; तर मुंबईतील बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये त्यांच्या रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.
© IE Online Media Services (P) Ltd