सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी २३ जून रोजी लग्न केलं. अजूनही या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा आहे. त्यांच्या लग्नातील अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. सोनाक्षी व झहीर यांच्या लग्नाला त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती, त्यापैकी काही जणांनी अनसीन व्हिडीओ व फोटो शेअर केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोनाक्षी व झहीर दोघांचं आंतरधर्मीय लग्न होतं. त्यांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. या लग्नात हिंदू धर्मातील रितीरिवाजानुसार काही विधी झाले. त्यांच्या लग्नाच्या जवळपास १० दिवसांनी सोनाक्षीची मैत्रीण प्राची मिश्रा हिने एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सोनाक्षी व झहीरचे लग्न तसेच रिसेप्शनची झलक पाहायला मिळते. या व्हिडीओबरोबर प्राचीने एक सुंदर कॅप्शन दिलं आहे. या कॅप्शनची चांगलीच चर्चा होत आहे.

राजकारण्याशी जवळीक, ईडी चौकशी अन् दुबई…, सोनाक्षी सिन्हाच्या सासऱ्यांबद्दल तिच्या भावाची पोस्ट चर्चेत

प्राची मिश्राने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नाची आणि रिसेप्शनची झलक पाहायला मिळते. व्हिडीओची सुरुवात त्यांच्या घरी लग्नाची नोंदणी झाल्यापासून होते. यात सोनाक्षी कागदपत्रांवर सही केल्यानंतर भावूक होते. त्यानंतर दोघांचा डान्स पाहायला मिळतो.

पदरात दोन मुलं अन् पस्तिशीत झाली विधवा; अभिनेत्री शांतीप्रियाने सांगितला पती सिद्धार्थ रेच्या निधनानंतरचा कठीण काळ

कॅप्शनमध्ये प्राचीने व्हॉईस मेसेज आणि व्हिडीओ कॉलचा उल्लेख केला. लग्नाच्या एक दिवसाआधी प्राची वरपक्षाकडून होती आणि नंतर वधूपक्षाकडून झाली असं तिने सांगितलं. तिने सोनाक्षी व झहीरचं कौतुक केलं आणि माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांचा या दोघांवरही काहीच परिणाम झाला नाही. पाहुण्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत याची त्यांनी पूर्ण काळजी घेतली असंही तिने नमूद केलं.

प्राचीने लिहिलं, “हिंदू परंपरेनुसार लग्नाची सुरुवात कन्यादानाने झाली. जेव्हा मशिदीतील अजानचा आवाज मंत्रांमध्ये मिसळला तेव्हा ही परंपरा आणखीच खास झाली. तुमच्या या खास दिवसाचा याचा एक भाग असल्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत. तुम्हा दोघांचे एकत्र आयुष्य खूप आनंदी जावो याच सदिच्छा.”

अपयश आल्याने शशी कपूर यांच्या तिन्ही मुलांनी सोडलं बॉलीवूड, आता काय करतात? जाणून घ्या

प्राचीने शेअर केलेल्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा आहे. सात वर्षानंतर एकमेकांना डेट केल्यावर सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांनी लग्न केलं. दोघांचे धर्म वेगळे असल्याने त्यांनी विशेष विवाह कायद्यानुसार नोंदणी पद्धतीने लग्न केलं आणि नंतर रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती. त्यांच्या रिसेप्शनला बॉलीवूड सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonakshi sinha zaheer iqbal friend prachi mishra says wedding was harmony of holy mantras and azaan hrc