बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोनाक्षीनं २३ जून रोजी झहीर इक्बालशी नोंदणी पद्धतीनं लग्न केलं. सोनाक्षीच्या या आंतरधर्मीय विवाहामुळे तिला खूप ट्रोलदेखील केलं गेलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोनाक्षीनं सोशल मीडियावर तिच्या लग्न आणि स्वागत अशा दोन्ही समारंभांचे फोटो शेअर केले होते. ते मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. आता सोनाक्षीनं तिच्या हनिमूनचेही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघंही पूलमध्ये त्यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण क्षणांसाठी वेळ देताना दिसतायत. सोनाक्षीनं शेअर केलेल्या एका फोटोमध्ये झहीर शर्टलेस दिसतोय; तर सोनाक्षी काळ्या रंगाच्या स्विम सूटमध्ये दिसतेय. ‘Beautiful Sunsets‘ अशी कॅप्शन सोनाक्षीनं या फोटोला दिली आहे. तर सोनाक्षीनं दुसरा एक फोटो शेअर करीत ‘काय सुंदर दिवस आहे‘, असं कॅप्शनही दिलंय.

हेही वाचा… ठरलं तर मग: तन्वीने शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ पाहून अर्जुन-सायलीसह सुभेदार कुटुंबाला बसणार धक्का, पाहा प्रोमो

झहीरनं एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे; ज्यात सोनाक्षी हसताना दिसतेय. “तिला माझ्यावर ओरडायचं होतं, रागवायचं होतं; पण मी तिला हसवलं #husbandhacks”, अशी कॅप्शन झहीरनं या व्हिडीओला दिली आहे. सोनाक्षीनं तिच्या हनिमूनचे फोटो जरी शेअर केले असले तरी ती दोघं हनिमूनसाठी नक्की कुठे गेली आहेत याचा खुलासा केलेला नाही.

सोनाक्षीनं झहीर इक्बालशी विशेष विवाह कायद्यानुसार लग्न केलं. लग्नासाठी अभिनेत्रीनं ऑफ व्हाईट रंगाची चिकनकारी साडी नेसली होती. केसात गजरा, गोल्डन ज्वेलरी व मिनिमल मेकअप यांत नववधूचं सौंदर्य अगदी खुलून दिसत होतं. सोनाक्षीनं या खास दिवशी तिच्या आईची म्हणजेच पूनम यांची साडी नेसली होती. झहीरनं सोनाक्षीला मॅचिंग करीत डिझायनर कुर्ता परिधान केला होता. सोनाक्षी-झहीरच्या स्वागत समारंभाला सलमान खान, रविना टंडन, अनिल कपूर, विद्या बालन, रिचा चड्ढा, काजोल अशा बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनीही हजेरी लावली होती.

हेही वाचा… शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रकृतीबद्दल दिली अपडेट; लेक सोनाक्षीचं नाव घेत म्हणाले, “हे सगळं तिने…”

दरम्यान, सोनाक्षी आणि झहीर यांच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगायचं झालं तर, २३ जून २०१७ पासून दोघं रिलेशनशिपमध्ये होती. सात वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी मुंबईमध्ये नोंदणी पद्धतीनं लग्न केलं; तर मुंबईतील बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये त्यांच्या स्वागत समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonakshi sinha zaheer iqbal honeymoon romantic photos viral on social media dvr