बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बाल यांच्या लग्नाच्या सध्या जोरदार चर्चा होत आहेत. दोघे २३ जूनला लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. सोनाक्षी व झहीर यांचं लग्न मुंबईत होणार असल्याचं कळतंय. लग्नाच्या चर्चा होऊ लागताच या जोडप्याबद्दल चाहत्यांची क्रेझ खूप वाढली आहे, त्यांना या दोघांबद्दल सर्व काही जाणून घ्यायचं आहे. लोक या दोघांच्या लव्ह स्टोरीपासून ते नेटवर्थपर्यंत सर्च करत आहेत. सोनाक्षी सिन्हा आणि तिचा बॉयफ्रेंड यांच्यापैकी कोण जास्त श्रीमंत आहे आणि दोघांची संपत्ती किती आहे, जाणून घेऊयात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनाक्षी १०० कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालक आहे. तिच्याकडे मुंबईतील वांद्रे भागातील केसी रोड याठिकाणी 4 बीएचके अपार्टमेंट आहे, जे तिने गेल्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये विकत घेतलं होतं. त्याची किंमत १४ कोटी रुपये आहे. याशिवाय तिचं आणखी एक घर आहे ज्याची किंमत ११ कोटी रुपये आहे. सोनाक्षीच्या कारबद्दल बोलायचं झाल्यास ती एक नव्हे तर तीन आलिशान गाड्यांची मालकीण आहे. तिच्याकडे BMW 6 सीरिज आहे, या कारची किंमत ७५ लाख रुपये आहे, मर्सिडीज बेंझ एस क्लास 350d आहे, तिची किंमत आहे १.४२ कोटी रुपये आणि तिसरी कार बीएमडब्ल्यू I8 आहे, तिची किंमत ३.३० कोटी आहे.

हेही वाचा – झहीर इक्बालशी लग्नाच्या चर्चा, सोनाक्षी सिन्हा म्हणाली, “मला माझ्या आई-वडिलांपेक्षा…”

सोनाक्षी सिन्हाचे मानधन

सोनाक्षी सिन्हा ही बॉलीवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी आहे आहे. ती तिच्या चित्रपटासाठी तीन कोटी रुपये मानधन घेते. चित्रपटांव्यतिरिक्त ती जाहिराती आणि ब्रँड एंडोर्समेंटमधूनही कमाई करते. यासोबतच तिचा स्वतःचा नेल ब्रँड आहे, ज्याचे नाव सोईजी आहे. तिने हा ब्रँड एका ई-कॉमर्स स्टोअरसह लाँच केला आहे.

हेही वाचा – सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “आजकालची मुलं आई-वडिलांची…”

बॉयफ्रेंडपेक्षा वयाने मोठी आहे सोनाक्षी सिन्हा, अभिनेत्री ३७ वर्षांची तर झहीर इक्बालचं वय…

सोनाक्षी व झहीरची संपत्ती किती?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनाक्षी आणि झहीर इक्बाल यांच्या संपत्तीमध्ये खूप फरक आहे. सोनाक्षीची संपत्ती १०० कोटी रुपये आहे, तर इक्बालकडे दोन कोटी रुपयांची संपत्ती आहे. अभिनयासोबतच तो ब्रँड एंडोर्समेंटही करतो. त्याच्या कारबद्दल बोलायचं झाल्यास, त्याच्याकडे मर्सिडीज बेंझ एम-क्लास आहे. या कारची किंमत ५६.७४ लाख रुपयांपासून सुरू होते.