Sonakshi Sinha Wedding: गेल्या काही दिवसांपासून ज्या क्षणाची सर्वजण वाट पाहत होते, तो क्षण अखेर पार पडला आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अभिनेता झहीर इक्बालबरोबर लग्नबंधनात अडकली आहे. नोंदणी पद्धतीनं दोघांनी लग्न करून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. दोन्ही कुटुंबियांच्या उपस्थितीत सोनाक्षी व झहीरचा लग्नसोहळा पार पडला आहे. या लग्नातील खास क्षणांचे फोटो शेअर करून अभिनेत्रीनं चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
सोनाक्षी व झहीर यांच्या लग्नाआधीचे विधी शुक्रवारपासून सुरू झाले होते. पहिल्या दिवशी मेहंदी समारंभ झाला. त्यानंतर शनिवारी सोनाक्षीच्या घरी म्हणजेच मुंबईतील ‘रामायणा’ बंगल्यावर खास पूजा ठेवली होती आणि आज दोघांचं नोंदणी पद्धतीनं लग्न झालं आहे. लग्नासाठी सोनाक्षीनं खास ऑफ व्हाइट रंगाची सुंदर साडी नेसली होती. ज्यावर मॅचिंग चोकर, कानातले आणि बांगड्या घातल्या होत्या. तसंच केसात गजरा माळला होता. तर झहीरनं सोनाक्षीला मॅचिंग करण्यासाठी व्हाइट रंगाची शेरवानी परिधान केली होती.
हेही वाचा – किरण मानेंच्या पत्नीला पाहिलंत का? खास पोस्ट लिहित म्हणाले, “माझा हात हातात घेऊन…”
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत लिहिलं, “आजच्याच दिवशी सात वर्षांपूर्वी (२३.०६.२०१७) आम्ही एकमेकांच्या डोळ्यात प्रेम पाहिलं आणि ते प्रेम टिकवण्याचा निर्णय घेतला. आज त्या प्रेमानं आम्हाला सर्व आव्हानांमध्ये व यशामध्ये मार्गदर्शन केलं आहे. तसंच या क्षणापर्यंत नेलं आहे. आमच्या दोन्ही कुटुंबांच्या आणि आमच्या दोन्ही देवांच्या आशीर्वादानं आता आम्ही नवरा आणि बायको झालो आहोत…सोनाक्षी आणि झहीर…२३.०६.२०२४”
हेही वाचा – विजय मल्ल्याच्या लेकानं ख्रिश्चन पद्धतीनं गर्लफ्रेंडशी केलं लग्न, पहिला फोटो आला समोर
दरम्यान, सोनाक्षी हिंदू असल्यामुळे आणि झहीर मुस्लिम असल्यामुळे दोघं कोणत्या पद्धतीनं लग्न करणार? सोनाक्षी लग्नानंतर इस्लाम धर्म स्वीकारणार अशा अनेक चर्चा रंगल्या होत्या. पण यावर सोनाक्षीचे सासरे इक्बाल रत्नासी यांनी माध्यमांना स्पष्ट उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते, “ती धर्मांतर करणार नाही. इथे दोन मनं एकत्र येत आहेत, त्यामुळे यात धर्म हा विषय नाही. माझा मानवतेवर विश्वास आहे. हिंदू धर्मात देवाला भगवान म्हणतात आणि मुस्लीम धर्मीय अल्लाह म्हणतात. पण सरतेशेवटी आपण सर्वजण माणूस आहोत. माझे आशीर्वाद नेहमी झहीर आणि सोनाक्षीच्या पाठीशी आहेत. दोघांचं लग्न नोंदणी पद्धतीनं होणार आहे.”